S M L

मुंबई एअरपोर्टवरील ग्राउंड स्टाफ कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या धोक्यात

22 नोव्हेंबर, मुंबईविनोद तळेकरमुंबई एअरपोर्टवर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ग्राऊंड स्टाफ म्हणून काम करणार्‍या जवळपास पाच ते दहा हजार कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत. या कामगारांनी आपल्या समस्या आता मनसेच्या नेत्यांसमोर मांडल्या आहेत. मनसेकडूनही त्यांना आता मदतीचं आश्वासन देण्यात आलंय. जॅक एअरपोर्ट सर्व्हिसेस मध्ये काम करणारा बाळासाहेब सध्या धास्तावलाय. कारण एक जानेवारीपासून त्याच्या नोकरीवर संक्रांत येण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि जीव्हीके या मुंबई एअरपोर्टचं व्यवस्थापन बघणार्‍या कंपन्यांनी आता या पुढे फक्त दोनच एजन्सीजना एअरलाईन्स कंपन्यांमध्ये ग्राउंड वर्क करण्याची परवानगी दिलीय. त्यामुळे सध्या हे काम करणार्‍या एजन्सीज आणि त्यांच्या कामगारांवर नोकर्‍या गमावण्याची वेळ आलीय. 'जर फक्त दोनच एजन्सीजना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं तर त्या दोन एजन्सीजमध्ये मग आम्हाला पण नोकर्‍या द्या' अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.आता या कामगारांनी आपलं गार्‍हाणं मनसेच्या नेत्यांसमोर मांडलंय. मे. रणदिवे, जॅक, ओमेगा, आरसीसी,लाईव्ह वेल, क्रिस्टल आयएसएस, सॉफ्टटच, नोव्हा, ग्लोबग्राउंड, सीएससी यासारख्या ग्राउंड सर्व्हिसेस देणार्‍या एजन्सीमध्ये हे कामगार काम करीत होते. मनसेनेही या कामगारांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. 'कामगारांना योग्य न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. तो मिळाला नाही तर काय करायचं ते आम्ही बघून घेऊ' असं मनसेचे सरचिटणीस नितीन देसाई यांनी सांगितलं.शासनाच्या नव्या एअरपोर्ट ग्राउंड हॅन्डलींग पॉलीसीनुसार एअरपोर्ट व्यवस्थापनाचं कंत्राट घेणार्‍या कंपनीला याबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिल आहेत. आणि मुंबई एअरपोर्टची व्यवस्था बघणार्‍या जीव्हीके या कंपनीने फक्त दोनच एजन्सीजना हे काम देणार असल्याचं जाहीर केलंय. त्यासाठी टेंडरही काढलं जाईल. मात्र अनेक वर्ष हे काम करणार्‍या छोट्या एजन्सीजना बेताच्या आर्थिक रिस्थितीमुळे हे टेंडर भरणं मुश्किल आहे. त्यामुळेच या कामगारांच्या नोकर्‍या धोक्यात आहेत. आता यावर मनसे आपल्या पद्धतीने कसा तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2008 04:47 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2008 04:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close