S M L

धोणी-वीरुने मारली पत्रकार परिषदेला दांडी

24 फेब्रुवारीभारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात सुरु झालेली तू-तू-मैं-मैं काही थांबायचं नाव घेईना. धोणी आणि सेहवाग यांच्यात बेबनाव असल्याचं बोललं जातं आहे. पण आज दोघांपैकी एकानेही मीडियाशी संवाद साधला नाही. दोघं आज एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतील असा अंदाज होता. पण टीमचे मॅनेजर जी एस वालिया एकटेच मीडियाला सामोरे गेले. हे प्रकरण फारसं गंभीर नसल्याचे वालिया यांनी मीडियाला सांगितलं. शिवाय मीडिया रिपोर्ट एकतर्फी आणि पराचा कावळा करणारे आहेत असंही त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2012 12:39 PM IST

धोणी-वीरुने मारली पत्रकार परिषदेला दांडी

24 फेब्रुवारी

भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात सुरु झालेली तू-तू-मैं-मैं काही थांबायचं नाव घेईना. धोणी आणि सेहवाग यांच्यात बेबनाव असल्याचं बोललं जातं आहे. पण आज दोघांपैकी एकानेही मीडियाशी संवाद साधला नाही. दोघं आज एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतील असा अंदाज होता. पण टीमचे मॅनेजर जी एस वालिया एकटेच मीडियाला सामोरे गेले. हे प्रकरण फारसं गंभीर नसल्याचे वालिया यांनी मीडियाला सांगितलं. शिवाय मीडिया रिपोर्ट एकतर्फी आणि पराचा कावळा करणारे आहेत असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2012 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close