S M L

यंदाच्या 'ऑस्कर'वारीत मोठ्या सिनेमांची गर्दी

अंतरा चौघुले, मुंबई24 फेब्रुवारी2012 च्या ऍकॅडमी ऍवॉर्ड्स म्हणजे ऑस्करसाठी यावेळी बर्‍याच मोठ्या हॉलिवूड सिनेमांची टक्कर होणार आहे. 84 व्या ऍकॅडमी पुरस्कारांची 2012साठीची नामांकनं घोषित झाली आहे. एका बाजूला उत्कृष्ठ अभिनेत्यांची अभिनयाची कसोटी तर दुसर्‍या बाजूला वेगळ्या कथानकांची जोड...काही दिग्दर्शकांचे नवे प्रयोग तर काही नावाजलेल्या बॅनर्सचे नवे फंडे त्यामुळे यंदाचं ऑस्कर मोठ्या सिनेमांनी भरलेलं आहे. 'ह्यूगो'ला 11 नामांकनंदिग्दर्शक मार्टीन स्कॉरसेस याचा ह्युगो या 3 डी सिनेमाला 11 नामांकनं मिळाली आहेत. हा सिनेमा फॅमिली मिस्ट्री असून पॅरिस रेल्वेस्टेशनवर राहणार्‍या ह्यूगो नावाच्या मुलाची कथा सांगतो. आपल्या वडिलांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ह्यूगोची होणारी धडपड यात दाखवली आहे. 2012च्या ऑस्करमध्ये सगळ्यात जास्त नामांकनं मिळवण्याचा मान या सिनेमाने पटकवला आहे. 'द आर्स्टीस्ट' 10 नामांकनंमायकेल हाझनाविचनं दिग्दर्शिंत केलेला आणि रिलीजच्या आधीच लोकप्रिय झालेला द आर्स्टीस्ट हा सिनेमा नामांकनाच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. द आर्स्टीस्ट हा फ्रेंच रोमाँटिक सिनेमा आहे.1927 ते 1932 या काळातलं हॉलिवूडचं दर्शन घडवतो. जुन्या मूकपटांचा नायक आणि नवोदित अभिनेत्री यांच्यातलं गोड नातं या सिनेमात जेन डुर्जडिन आणि बेरिंस बेजो यांनी साकारलं आहे. जॉर्ज क्लूनीचा 'द डिसिडेंण्स' आणि 'मनीबॉल' या दोन सिनेमांबरोबर इतरही मोठे सिनेमे स्पर्धेत आहेत. जॉर्ज क्लूनी मुख्य भुमिकेत असलेला 'द डिसेंडंण्स' तर टॉम हॅन्क्स आणि सँन्ड्रा बुलक यांचा 'एक्सस्ट्रीमली लाउड ऍण्ड इंक्रिडेब्ली क्लोज' हे सिनेमे रेसमध्ये आहेत. आणि ब्रॅड पीटची मुख्य भूमिका असलेला स्पोर्ट्स बायोग्राफिकल ड्रामा 'मनीबॉल' तर मर्लिन मन्रोबरोबर एक आठवडा घालवणार्‍या क्लार्कची कथा सांगणारा 'अ वीक विथ मर्लिन' हेही महत्त्वाचे सिनेमे आहेत. एकूणच एकापेक्षा एक असे दमादार सिनेमे यंदाचं ऑस्कर गाजवणार हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2012 05:15 PM IST

यंदाच्या 'ऑस्कर'वारीत मोठ्या सिनेमांची गर्दी

अंतरा चौघुले, मुंबई

24 फेब्रुवारी

2012 च्या ऍकॅडमी ऍवॉर्ड्स म्हणजे ऑस्करसाठी यावेळी बर्‍याच मोठ्या हॉलिवूड सिनेमांची टक्कर होणार आहे. 84 व्या ऍकॅडमी पुरस्कारांची 2012साठीची नामांकनं घोषित झाली आहे. एका बाजूला उत्कृष्ठ अभिनेत्यांची अभिनयाची कसोटी तर दुसर्‍या बाजूला वेगळ्या कथानकांची जोड...काही दिग्दर्शकांचे नवे प्रयोग तर काही नावाजलेल्या बॅनर्सचे नवे फंडे त्यामुळे यंदाचं ऑस्कर मोठ्या सिनेमांनी भरलेलं आहे.

'ह्यूगो'ला 11 नामांकनंदिग्दर्शक मार्टीन स्कॉरसेस याचा ह्युगो या 3 डी सिनेमाला 11 नामांकनं मिळाली आहेत. हा सिनेमा फॅमिली मिस्ट्री असून पॅरिस रेल्वेस्टेशनवर राहणार्‍या ह्यूगो नावाच्या मुलाची कथा सांगतो. आपल्या वडिलांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ह्यूगोची होणारी धडपड यात दाखवली आहे. 2012च्या ऑस्करमध्ये सगळ्यात जास्त नामांकनं मिळवण्याचा मान या सिनेमाने पटकवला आहे.

'द आर्स्टीस्ट' 10 नामांकनंमायकेल हाझनाविचनं दिग्दर्शिंत केलेला आणि रिलीजच्या आधीच लोकप्रिय झालेला द आर्स्टीस्ट हा सिनेमा नामांकनाच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. द आर्स्टीस्ट हा फ्रेंच रोमाँटिक सिनेमा आहे.1927 ते 1932 या काळातलं हॉलिवूडचं दर्शन घडवतो. जुन्या मूकपटांचा नायक आणि नवोदित अभिनेत्री यांच्यातलं गोड नातं या सिनेमात जेन डुर्जडिन आणि बेरिंस बेजो यांनी साकारलं आहे.

जॉर्ज क्लूनीचा 'द डिसिडेंण्स' आणि 'मनीबॉल' या दोन सिनेमांबरोबर इतरही मोठे सिनेमे स्पर्धेत आहेत. जॉर्ज क्लूनी मुख्य भुमिकेत असलेला 'द डिसेंडंण्स' तर टॉम हॅन्क्स आणि सँन्ड्रा बुलक यांचा 'एक्सस्ट्रीमली लाउड ऍण्ड इंक्रिडेब्ली क्लोज' हे सिनेमे रेसमध्ये आहेत. आणि ब्रॅड पीटची मुख्य भूमिका असलेला स्पोर्ट्स बायोग्राफिकल ड्रामा 'मनीबॉल' तर मर्लिन मन्रोबरोबर एक आठवडा घालवणार्‍या क्लार्कची कथा सांगणारा 'अ वीक विथ मर्लिन' हेही महत्त्वाचे सिनेमे आहेत. एकूणच एकापेक्षा एक असे दमादार सिनेमे यंदाचं ऑस्कर गाजवणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2012 05:15 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close