S M L

लाज गेली, मालिकाही गेली ?

26 फेब्रुवारीएका पाठोपाठ पराभवाचे नारळ फोडत टीम इंडियाने आव्हान कायम ठेवणार्‍या मॅचमध्येही हरवून दाखवलं आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आम्ही पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत हे सिध्द करुन दाखवलं आहे. सिडनी वन डेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 87 रन्सनं पराभव केला आहे आणि या पराभवामुळे भारताचे ट्राय सीरिजमधील आव्हानही जवळपास संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेतला भारताचा हा चौथा पराभव ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी भारतासमोर 253 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण याला उत्तर देताना भारताची टीम अवघ्या 165 रन्सवर ऑलआऊट झाली.ओपनिंगला आलेल्या वीरेंद्र सेहवागनं फटकेबाजीच्या नादात पुन्हा आपली विकेट फेकली. सेहवाग फक्त 5 रन्स करुन आऊट झाला. सचिन तेंडुलकरने काही आक्रमक फटके मारले पण चिकी रन्स घेण्याच्या नादात तोही रनआऊट झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनं भारताची मधली फळीही झटपट गुंडाळली. गौतम गंभीर, विराट कोहली, सुरेश रैना आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणी मोठा स्कोर करण्यात अपयशी ठरले. आर अश्विन आणि इरफान पठाणने थोडी फार झुंज दिली खरी पण जिंकण्याच्या आशा केव्हाच संपल्या होत्या. या ट्राय सीरिजमध्ये भारताची आता श्रीलंकाविरुध्द फक्त एक मॅच बाकी आहे. आणि ही मॅच भारताला बोनस पॉइंटसह जिंकावी लागणार आहे. पण दुसरीकडे श्रीलंका पुढच्या दोन्ही मॅच हरली तर आणि तरच भारतीय टीमला थोडीफार आशा आहे. पण शक्यता फारच कमी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2012 10:49 AM IST

लाज गेली, मालिकाही गेली ?

26 फेब्रुवारी

एका पाठोपाठ पराभवाचे नारळ फोडत टीम इंडियाने आव्हान कायम ठेवणार्‍या मॅचमध्येही हरवून दाखवलं आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आम्ही पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत हे सिध्द करुन दाखवलं आहे. सिडनी वन डेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 87 रन्सनं पराभव केला आहे आणि या पराभवामुळे भारताचे ट्राय सीरिजमधील आव्हानही जवळपास संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेतला भारताचा हा चौथा पराभव ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी भारतासमोर 253 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण याला उत्तर देताना भारताची टीम अवघ्या 165 रन्सवर ऑलआऊट झाली.

ओपनिंगला आलेल्या वीरेंद्र सेहवागनं फटकेबाजीच्या नादात पुन्हा आपली विकेट फेकली. सेहवाग फक्त 5 रन्स करुन आऊट झाला. सचिन तेंडुलकरने काही आक्रमक फटके मारले पण चिकी रन्स घेण्याच्या नादात तोही रनआऊट झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनं भारताची मधली फळीही झटपट गुंडाळली. गौतम गंभीर, विराट कोहली, सुरेश रैना आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणी मोठा स्कोर करण्यात अपयशी ठरले. आर अश्विन आणि इरफान पठाणने थोडी फार झुंज दिली खरी पण जिंकण्याच्या आशा केव्हाच संपल्या होत्या. या ट्राय सीरिजमध्ये भारताची आता श्रीलंकाविरुध्द फक्त एक मॅच बाकी आहे. आणि ही मॅच भारताला बोनस पॉइंटसह जिंकावी लागणार आहे. पण दुसरीकडे श्रीलंका पुढच्या दोन्ही मॅच हरली तर आणि तरच भारतीय टीमला थोडीफार आशा आहे. पण शक्यता फारच कमी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2012 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close