S M L

पुण्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ग्रंथदिंडी

26 फेब्रुवारीयंदाचं वर्ष हे कुसुमाग्रजांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्म दिवस... हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुण्यात ग्रंथदिंडी काढण्यात आली. कसबा पेठ ते सदाशिव पेठेतल्या कुसुमाग्रजांच्या जन्मस्थळापर्यंत ही ग्रंथ दिंडी काढली होती. पुण्यातील इतिहास प्रेमी मंडळाने आयोजित केलेल्या या ग्रंथदिंडीत 16 विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी- विद्यार्थीनी यात सहभागी झाल्या होते. मराठी भाषेच्या जयजयकाराच्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रा. ग. जाधव, लेखिका अरूणा ढेरे, कवी संदीप खरे हजर होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2012 01:24 PM IST

पुण्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ग्रंथदिंडी

26 फेब्रुवारी

यंदाचं वर्ष हे कुसुमाग्रजांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्म दिवस... हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुण्यात ग्रंथदिंडी काढण्यात आली. कसबा पेठ ते सदाशिव पेठेतल्या कुसुमाग्रजांच्या जन्मस्थळापर्यंत ही ग्रंथ दिंडी काढली होती. पुण्यातील इतिहास प्रेमी मंडळाने आयोजित केलेल्या या ग्रंथदिंडीत 16 विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी- विद्यार्थीनी यात सहभागी झाल्या होते. मराठी भाषेच्या जयजयकाराच्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रा. ग. जाधव, लेखिका अरूणा ढेरे, कवी संदीप खरे हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2012 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close