S M L

वडिलांचे निधन झाले, पण अर्चनाने 12 चा पेपर दिला

26 फेब्रुवारीवडिलांच्या निधनाचा धक्का पचवूनसुद्धा एका धाडसी मुलीनं आपला 12 वीचा पेपर दिला. धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या अर्चना माळी हिच्या धाडसाने धुळेकर निशब्द झाले आहे. अर्चनाची 12 वीची परीक्षा सुरू असतानाच शेतकरी असलेल्या तिच्या वडिलांनी त्यांच्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली. घरचा कर्तापुरष गेल्यामुळे कुटुंबावर एकच आभाळ कोसळलं. वडिलांनी मुलीनं मोठ शिकावं,मोठ व्हावं आणि तिने शिक्षिका बनवा असं स्वप्न उराशी बाळगलं होतं. वडिल्यांच्या जाण्याचं दुख पचवत अर्चनाने वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मनावर दगड ठेऊन अभ्यास सुरुच ठेवला. बारावीची परीक्षा अजून सुरु आहे. अर्चना जिद्दीने अभ्यास करत पेपर सोडतं आहे. अर्चनाचा भाऊ दहावीला आहे. बहिणीकडून प्रेरणा घेऊन तोही परीक्षेची तयारी करतोय. अर्चनाची जिद्द पाहुन धुळेकर भारवून गेला आहे. आज गावातला प्रत्येक जण तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचं वचन देत आहे. अशा या धाडसी अर्जनाला आयबीएन लोकमतचा सलाम आणि बारावीच्या परीक्षेला शुभेच्छा !

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2012 02:40 PM IST

वडिलांचे निधन झाले, पण अर्चनाने 12 चा पेपर दिला

26 फेब्रुवारी

वडिलांच्या निधनाचा धक्का पचवूनसुद्धा एका धाडसी मुलीनं आपला 12 वीचा पेपर दिला. धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या अर्चना माळी हिच्या धाडसाने धुळेकर निशब्द झाले आहे. अर्चनाची 12 वीची परीक्षा सुरू असतानाच शेतकरी असलेल्या तिच्या वडिलांनी त्यांच्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली. घरचा कर्तापुरष गेल्यामुळे कुटुंबावर एकच आभाळ कोसळलं. वडिलांनी मुलीनं मोठ शिकावं,मोठ व्हावं आणि तिने शिक्षिका बनवा असं स्वप्न उराशी बाळगलं होतं. वडिल्यांच्या जाण्याचं दुख पचवत अर्चनाने वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मनावर दगड ठेऊन अभ्यास सुरुच ठेवला. बारावीची परीक्षा अजून सुरु आहे. अर्चना जिद्दीने अभ्यास करत पेपर सोडतं आहे. अर्चनाचा भाऊ दहावीला आहे. बहिणीकडून प्रेरणा घेऊन तोही परीक्षेची तयारी करतोय. अर्चनाची जिद्द पाहुन धुळेकर भारवून गेला आहे. आज गावातला प्रत्येक जण तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचं वचन देत आहे. अशा या धाडसी अर्जनाला आयबीएन लोकमतचा सलाम आणि बारावीच्या परीक्षेला शुभेच्छा !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2012 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close