S M L

चक दे इंडिया ; भारताचे 'लंडन ड्रीम'पूर्ण

26 फेब्रुवारीअखेर भारतीय हॉकी टीम लंडन ऑलिम्पिकचं तिकिट मिळवण्यात यशस्वी झाली आहे. ऑलिम्पिक हॉकी क्वालिफाइंग स्पर्धेच्या फायनलमध्ये आज भारताने फ्रान्सचा 8-1 असा धुव्वा उडवला. या विजयानंतर भारतीय खेळाडू आणि स्टेडिअमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.फायनल मॅचवर सुरुवातीपासून भारतानं वर्चस्व गाजवलं होतं. 17 व्या मिनिटाला बिरेंद्र लाक्रानं पहिला गोल करत गोलचं खातं उघडलं. तर संदीप सिंगनं पेनल्टी कॉर्नरवर सलग दोन गोल करत भारताला पहिल्या हाफमध्येच भक्कम आघाडी मिळवून दिली. मॅचच्या दुसर्‍या हाफमध्ये भारताने आणखी पाच गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. जबरदस्त फॉर्मात असलेल्या संदीप सिंगन या मॅचमध्ये तब्बल 5 गोल केले. तर बिरेंद्र लाक्रा, सुनिल छेत्री आणि व्ही आर रघुनाथनं प्रत्येकी एक गोल केला. ऑलिम्पिकमध्ये भारतीय टीमच्या नावावर विक्रमी 8 गोल्ड मेडल जमा आहेत. पण गेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय टीम क्वालिफाय होऊ शकली नाही. 8 वर्षात पहिल्यांदाच भारतावर ही नामुष्की ओढावली होती. पण आता लंडन ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होत भारतीय हॉकी टीमनं ही नामुष्की दूर केली आहे. भारतीय हॉकी टीमची कामगिरीऑलिम्पिक हॉकी क्वालिफाइंग स्पर्धेत भारतानं जबरदस्त कामगिरी केली आहे. सहा मॅचमध्ये भारतानं तब्बल 44 गोल केले आहेत. टीमचा पहिला मुकाबला होता तो सिंगापूरशी. दुबळ्या सिंगापूरचा भारतीय टीमने 15-1 असा धुव्वा उडवला. गुरविंदर सिंग चंडीने या मॅचमध्ये गोलची हॅटट्रीक केली. सिंगापूर नंतर मुकाबला होता इटलीशी. आणि ही मॅचही टीमने आरामात 8-1ने जिंकली. या मॅचचा हिरो ठरला संदीप सिंग. त्याने 3 गोल केले. फ्रान्सविरुद्धच्या मॅचमध्ये संदीप सिंगने स्पर्धेतली सलग दुसरी हॅटट्रीक केली. पेनल्टी कॉर्नरवर हमखास गोल करत त्याने विजयात मोलाचा वाटा उचलला. ही मॅच भारताने 6-2 अशी जिंकली. यानंतर कॅनडा ही भारतासाठी तुल्यबळ टीम होती. अंदाजाप्रमाणे ही मॅच रंगलीही शेवटपर्यंत पण अखेर भारतीय टीमने ही मॅच 3-2 अशी निसटत्या फरकाने जिंकली. लीगमध्ये भारताची शेवटची मॅच होती ती जागतिक क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर असलेल्या पोलंडशी. भारताने पोलंडचा 4-2 असा पराभव करत फायनल गाठली. आणि आज फायनलमध्ये फ्रान्सचा तब्बल 8-1 असा धुव्वा उडवत भारतीय टीम लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलीय. या मॅचमध्ये संदीप सिंगनं तब्बल 5 गोल केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2012 04:30 PM IST

चक दे इंडिया ; भारताचे 'लंडन ड्रीम'पूर्ण

26 फेब्रुवारी

अखेर भारतीय हॉकी टीम लंडन ऑलिम्पिकचं तिकिट मिळवण्यात यशस्वी झाली आहे. ऑलिम्पिक हॉकी क्वालिफाइंग स्पर्धेच्या फायनलमध्ये आज भारताने फ्रान्सचा 8-1 असा धुव्वा उडवला. या विजयानंतर भारतीय खेळाडू आणि स्टेडिअमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.फायनल मॅचवर सुरुवातीपासून भारतानं वर्चस्व गाजवलं होतं. 17 व्या मिनिटाला बिरेंद्र लाक्रानं पहिला गोल करत गोलचं खातं उघडलं. तर संदीप सिंगनं पेनल्टी कॉर्नरवर सलग दोन गोल करत भारताला पहिल्या हाफमध्येच भक्कम आघाडी मिळवून दिली. मॅचच्या दुसर्‍या हाफमध्ये भारताने आणखी पाच गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. जबरदस्त फॉर्मात असलेल्या संदीप सिंगन या मॅचमध्ये तब्बल 5 गोल केले. तर बिरेंद्र लाक्रा, सुनिल छेत्री आणि व्ही आर रघुनाथनं प्रत्येकी एक गोल केला. ऑलिम्पिकमध्ये भारतीय टीमच्या नावावर विक्रमी 8 गोल्ड मेडल जमा आहेत. पण गेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय टीम क्वालिफाय होऊ शकली नाही. 8 वर्षात पहिल्यांदाच भारतावर ही नामुष्की ओढावली होती. पण आता लंडन ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होत भारतीय हॉकी टीमनं ही नामुष्की दूर केली आहे.

भारतीय हॉकी टीमची कामगिरीऑलिम्पिक हॉकी क्वालिफाइंग स्पर्धेत भारतानं जबरदस्त कामगिरी केली आहे. सहा मॅचमध्ये भारतानं तब्बल 44 गोल केले आहेत. टीमचा पहिला मुकाबला होता तो सिंगापूरशी. दुबळ्या सिंगापूरचा भारतीय टीमने 15-1 असा धुव्वा उडवला. गुरविंदर सिंग चंडीने या मॅचमध्ये गोलची हॅटट्रीक केली. सिंगापूर नंतर मुकाबला होता इटलीशी. आणि ही मॅचही टीमने आरामात 8-1ने जिंकली. या मॅचचा हिरो ठरला संदीप सिंग. त्याने 3 गोल केले. फ्रान्सविरुद्धच्या मॅचमध्ये संदीप सिंगने स्पर्धेतली सलग दुसरी हॅटट्रीक केली. पेनल्टी कॉर्नरवर हमखास गोल करत त्याने विजयात मोलाचा वाटा उचलला. ही मॅच भारताने 6-2 अशी जिंकली. यानंतर कॅनडा ही भारतासाठी तुल्यबळ टीम होती. अंदाजाप्रमाणे ही मॅच रंगलीही शेवटपर्यंत पण अखेर भारतीय टीमने ही मॅच 3-2 अशी निसटत्या फरकाने जिंकली. लीगमध्ये भारताची शेवटची मॅच होती ती जागतिक क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर असलेल्या पोलंडशी. भारताने पोलंडचा 4-2 असा पराभव करत फायनल गाठली. आणि आज फायनलमध्ये फ्रान्सचा तब्बल 8-1 असा धुव्वा उडवत भारतीय टीम लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलीय. या मॅचमध्ये संदीप सिंगनं तब्बल 5 गोल केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2012 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close