S M L

जैतापूर प्रश्नी शिवसेनेनं काकोडकरांना धमकावले

27 फेब्रुवारीजैतापूर प्रकल्पावरून शिवसेनेनं पुन्हा दडपशाही सुरू केली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना शिवसेनेनं लक्ष्य केलंय आणि जैतापूर प्रकल्पाचं समर्थन करू नका, अशी धमकीही दिली. जैतापूरच्या प्रश्नावरून झालेला गदारोळ, हिंसाचार आणि तणावाचं वातावरण शांत होत नाही तोच शिवसेनेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत या प्रश्नावर दडपशाही सुरू केली. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी जैतापूर प्रकल्पाचं समर्थन करू नये असा इशारा शिवसेनेनं दिला. एवढचं नाही तर रत्नागिरीजवळ राजापूरमध्ये होणारं काकोडकरांचं चर्चासत्रही त्यांनी आयोजकांना रद्द करायला लावलं आहे.काकोडकर यांचा निषेध करण्यासाठी आज शिवसैनिकांनी पुण्यातही आंदोलन केलं. विज्ञान दिनानिमित्त आगरकर रिसर्च इन्सिट्यूटमध्ये काकोडकरांचं व्याख्यान होतं. तिथे हे शिवसैनिक पोहोचले. अखेर काकोडकर जैतापूरवर बोलणार नाहीत, असं पत्र आगरकर इन्स्टिट्यूटनं दिल्यानंतरच शिवसैनिकांनी आजचं आंदोलन मागे घेतलं. शिवसेनेच्या या आंदोलनाचं उद्धव ठाकरेंनीही समर्थन केलं आहे. तर जैतापूरबद्दल शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेबद्दल खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केली. जैतापूर प्रकल्पाला विरोध करणार्‍यांविरोधात सरकारने दडपशाही केली. त्यादडपशाहीविरोधात आवाज उठवणार्‍या शिवसेनेडूनही दडपशाहीचंच तंत्र वापरलं जातंय, हा मोठा विरोधाभास आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2012 09:41 AM IST

जैतापूर प्रश्नी शिवसेनेनं काकोडकरांना धमकावले

27 फेब्रुवारी

जैतापूर प्रकल्पावरून शिवसेनेनं पुन्हा दडपशाही सुरू केली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना शिवसेनेनं लक्ष्य केलंय आणि जैतापूर प्रकल्पाचं समर्थन करू नका, अशी धमकीही दिली. जैतापूरच्या प्रश्नावरून झालेला गदारोळ, हिंसाचार आणि तणावाचं वातावरण शांत होत नाही तोच शिवसेनेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत या प्रश्नावर दडपशाही सुरू केली. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी जैतापूर प्रकल्पाचं समर्थन करू नये असा इशारा शिवसेनेनं दिला. एवढचं नाही तर रत्नागिरीजवळ राजापूरमध्ये होणारं काकोडकरांचं चर्चासत्रही त्यांनी आयोजकांना रद्द करायला लावलं आहे.

काकोडकर यांचा निषेध करण्यासाठी आज शिवसैनिकांनी पुण्यातही आंदोलन केलं. विज्ञान दिनानिमित्त आगरकर रिसर्च इन्सिट्यूटमध्ये काकोडकरांचं व्याख्यान होतं. तिथे हे शिवसैनिक पोहोचले. अखेर काकोडकर जैतापूरवर बोलणार नाहीत, असं पत्र आगरकर इन्स्टिट्यूटनं दिल्यानंतरच शिवसैनिकांनी आजचं आंदोलन मागे घेतलं.

शिवसेनेच्या या आंदोलनाचं उद्धव ठाकरेंनीही समर्थन केलं आहे. तर जैतापूरबद्दल शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेबद्दल खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केली. जैतापूर प्रकल्पाला विरोध करणार्‍यांविरोधात सरकारने दडपशाही केली. त्यादडपशाहीविरोधात आवाज उठवणार्‍या शिवसेनेडूनही दडपशाहीचंच तंत्र वापरलं जातंय, हा मोठा विरोधाभास आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2012 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close