S M L

भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रगती दर निचांकी पातळीवर

29 फेब्रुवारीभारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर गेल्या अडीच वर्षातल्या सगळ्यात खालच्या पातळीला गेला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतल्या 6.9 टक्क्यांवरून प्रगतीचा दर 6.1 टक्क्यांवर आला आहे. सगळ्यात जास्त घसरण कृषी उत्पादनाच्या दरामध्ये झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा दर 11 टक्क्यांवर होता तो आता 2.7 टक्क्यांवर आला आहे. इंडस्ट्रीच्या प्रगती दरातही घसरण आहे. हा दर गेल्यावर्षीच्या 7.6 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांवर आला आहे. फक्त दिलासा आहे तो सर्व्हिस सेक्टरच्या प्रगतीमध्ये. हा दर एका टक्क्याने वाढून आता 9 टक्के झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 29, 2012 10:17 AM IST

भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रगती दर निचांकी पातळीवर

29 फेब्रुवारी

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर गेल्या अडीच वर्षातल्या सगळ्यात खालच्या पातळीला गेला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतल्या 6.9 टक्क्यांवरून प्रगतीचा दर 6.1 टक्क्यांवर आला आहे. सगळ्यात जास्त घसरण कृषी उत्पादनाच्या दरामध्ये झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा दर 11 टक्क्यांवर होता तो आता 2.7 टक्क्यांवर आला आहे. इंडस्ट्रीच्या प्रगती दरातही घसरण आहे. हा दर गेल्यावर्षीच्या 7.6 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांवर आला आहे. फक्त दिलासा आहे तो सर्व्हिस सेक्टरच्या प्रगतीमध्ये. हा दर एका टक्क्याने वाढून आता 9 टक्के झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 29, 2012 10:17 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close