S M L

गिरणी कामगार पुन्हा रस्त्यावर

01 मार्च 2012आपल्या हक्काच्या घराच्या मागणीसाठी मुंबईतील गिरणी कामगार आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहे. करी रोड स्टेशन ते गोल्डमोहोर मिलपर्यंत गिरणी कामगारांचा मोर्चा निघाला. मात्र गिरणी कामगारांचा हा मोर्चा पोलिसांनी लालबागजवळ अडवला. आणि मोर्चेकर्‍यांना ताब्यात घेऊन त्यांना भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. पण तिथंही गिरणी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत आंंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गिरण्यांची जमीन कामगारांच्या घरांसाठी द्यावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. दत्ता इस्वलकर, प्रवीण घाग यांच्यासह गिरणी कामगारांच्या 9 संघटना या मोर्च्यात सहभागी झाल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2012 09:46 AM IST

गिरणी कामगार पुन्हा रस्त्यावर

01 मार्च 2012

आपल्या हक्काच्या घराच्या मागणीसाठी मुंबईतील गिरणी कामगार आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहे. करी रोड स्टेशन ते गोल्डमोहोर मिलपर्यंत गिरणी कामगारांचा मोर्चा निघाला. मात्र गिरणी कामगारांचा हा मोर्चा पोलिसांनी लालबागजवळ अडवला. आणि मोर्चेकर्‍यांना ताब्यात घेऊन त्यांना भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. पण तिथंही गिरणी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत आंंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गिरण्यांची जमीन कामगारांच्या घरांसाठी द्यावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. दत्ता इस्वलकर, प्रवीण घाग यांच्यासह गिरणी कामगारांच्या 9 संघटना या मोर्च्यात सहभागी झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2012 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close