S M L

रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ लांबणीवर

01 मार्चमुंबईतील टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडेवाढ सध्या टळली आहे. पण पुढच्या महिन्यात 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनसाडेसात लाख रिक्षा बेमुदत संपावर जाणार आहे. या आंदोलनात 15 लाख रिक्षाचालक रस्त्यावर उतरतील सरकारने आमच्याशी खोटेपणा केला यांना धडा शिवण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत असा इशारा कामगार नेते शरद राव यांनी दिला. आज मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीसंदर्भात मंत्रालयात बैठक होणार होती मात्र ही बैठक रद्द करण्यात आली. या बैठकीत टॅक्सीसाठी किमान भाडं 16 रुपयांवरुन 20 रुपये, तर नंतरचं भाडं प्रत्येक किलोमीटरमागे 2 रूपयांनी वाढवावं तसेच रिक्षाचं किमान भाडं 11 ऐवजी 16 रुपये करण्याची युनियनची मागणी होती. मात्र कामगार नेते शरद राव यांनी पत्रकार परिषद घेईन भाडेवाढ पुढे ढकलली. सरकारने इलेक्ट्रॉनिक मीटरबाबत कोर्टाकडे स्थगिती मागितली नव्हती. इलेक्ट्रॉनिक मीटरबाबत सरकारनं खोटेपणा केला आहे तसेच उलट नियम धाब्यावर बसवून सरकारनं नोटीफिकेशन काढले असा आरोप राव यांनी केला तसेच रिक्षाची दरवाढ ही राहाणीमानाच्या खर्चावर असायली हवी ती सीएनजीच्या दरावर नको अशी मागणीही राव यांनी केली. त्याचबरोबर आजची भाववाढ पुढे ढकलण्यात येत आहे पण पुढील महिन्याच्या 15 एप्रिलपासून मध्यरात्री सात लाख रिक्षाचालक बेमुदत संपावर जातील या आंदोलनात 15 लाख रिक्षाचालक रस्त्यावर उतरतील असा इशारा कामगार नेते शरद राव यांनी सरकारला दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2012 10:09 AM IST

रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ लांबणीवर

01 मार्च

मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडेवाढ सध्या टळली आहे. पण पुढच्या महिन्यात 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनसाडेसात लाख रिक्षा बेमुदत संपावर जाणार आहे. या आंदोलनात 15 लाख रिक्षाचालक रस्त्यावर उतरतील सरकारने आमच्याशी खोटेपणा केला यांना धडा शिवण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत असा इशारा कामगार नेते शरद राव यांनी दिला.

आज मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीसंदर्भात मंत्रालयात बैठक होणार होती मात्र ही बैठक रद्द करण्यात आली. या बैठकीत टॅक्सीसाठी किमान भाडं 16 रुपयांवरुन 20 रुपये, तर नंतरचं भाडं प्रत्येक किलोमीटरमागे 2 रूपयांनी वाढवावं तसेच रिक्षाचं किमान भाडं 11 ऐवजी 16 रुपये करण्याची युनियनची मागणी होती. मात्र कामगार नेते शरद राव यांनी पत्रकार परिषद घेईन भाडेवाढ पुढे ढकलली. सरकारने इलेक्ट्रॉनिक मीटरबाबत कोर्टाकडे स्थगिती मागितली नव्हती. इलेक्ट्रॉनिक मीटरबाबत सरकारनं खोटेपणा केला आहे तसेच उलट नियम धाब्यावर बसवून सरकारनं नोटीफिकेशन काढले असा आरोप राव यांनी केला तसेच रिक्षाची दरवाढ ही राहाणीमानाच्या खर्चावर असायली हवी ती सीएनजीच्या दरावर नको अशी मागणीही राव यांनी केली. त्याचबरोबर आजची भाववाढ पुढे ढकलण्यात येत आहे पण पुढील महिन्याच्या 15 एप्रिलपासून मध्यरात्री सात लाख रिक्षाचालक बेमुदत संपावर जातील या आंदोलनात 15 लाख रिक्षाचालक रस्त्यावर उतरतील असा इशारा कामगार नेते शरद राव यांनी सरकारला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2012 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close