S M L

दहावीची परीक्षा आजपासून सुरु

01 मार्च शालेय आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा ठरणार्‍या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेला एकूण 17 लाख 11 हजार 214 विद्यार्थी बसले आहेत. राज्यभरात एकू ण 3 हजार 730 केंद्रांवर ही परीक्षा सुरू झाली आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तणाव येऊ नये यापद्धतीने परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. दोन पेपर दरम्यान अंतर ठेवण्यात आलं असल्याची माहिती एसएससी बोर्डातर्फे देण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकुण 7 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबरोबरच संवेदनशील परीक्षा केंद्रांचे व्हिडिओ शुटिंगही केलं जाणार आहे. दरम्यान, परिक्षेला जाताना विद्यार्थ्यांना टेन्शन येऊ नये यासाठी पुण्यातल्या विमलाबाई गरवारे हायस्कूलनं अनोखा उपक्रम राबवला. परिक्षेसाठी शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांंचं औक्षण करण्यात आलं आणि गुलाबाचं फुल देऊन स्वागत करण्यात आलं. त्यानंतरच या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्यात आलं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गंभीर चेहर्‍यांवर हास्य फुललं.  

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2012 07:56 AM IST

दहावीची परीक्षा आजपासून सुरु

01 मार्च

 

शालेय आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा ठरणार्‍या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेला एकूण 17 लाख 11 हजार 214 विद्यार्थी बसले आहेत. राज्यभरात एकू ण 3 हजार 730 केंद्रांवर ही परीक्षा सुरू झाली आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तणाव येऊ नये यापद्धतीने परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. दोन पेपर दरम्यान अंतर ठेवण्यात आलं असल्याची माहिती एसएससी बोर्डातर्फे देण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकुण 7 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबरोबरच संवेदनशील परीक्षा केंद्रांचे व्हिडिओ शुटिंगही केलं जाणार आहे. दरम्यान, परिक्षेला जाताना विद्यार्थ्यांना टेन्शन येऊ नये यासाठी पुण्यातल्या विमलाबाई गरवारे हायस्कूलनं अनोखा उपक्रम राबवला. परिक्षेसाठी शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांंचं औक्षण करण्यात आलं आणि गुलाबाचं फुल देऊन स्वागत करण्यात आलं. त्यानंतरच या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्यात आलं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गंभीर चेहर्‍यांवर हास्य फुललं.  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2012 07:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close