S M L

गोव्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

दिनेश केळुसकर,पणजी01 मार्चगोवा विधानसभेच्या निवडणुकीचाही प्रचार आज संपला. शनिवारी एकाच टप्प्यात गोव्यात मतदान होतं आहे. काँग्रेस आणि भाजप दोघांनीही आप आपले दिग्गज नेते या प्रचारात उतरवले. भाजपने यावेळी पहिल्यांदाच सहा ख्रिश्चन उमेदवारांना तिकीट दिलंय. तर भाजपाची ही धर्मनिरपेक्षता केवळ देखावा असल्याचं काँग्रेसने म्हटलंय.अवघ्या 40 आमदारांच्या विधानसभेसाठी गोव्यात 74 अपक्ष उमेदवारांसह तब्बल 215 रिंगणात आहेत. सत्तेच्या गणितासाठी भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशीयुती करत 4 अपक्षांनांही पाठिंबा दिला. शिवाय ख्रिश्चन मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी 6 कॅथलिक उमेदवारांनाही पहिल्यांदाच तिकीट दिलंय.भाजपचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर म्हणतात, गेल्या निवडणुकीत कंँथलिक आमच्या नावावर उभे राहायला तयार नव्हते. त्यामुळे यावेळेला कँथलिक समाजातूनही आम्हाला सपोर्ट मिळतोय हे स्पष्ट झालंय.पण भाजपाच्या या रणनीतीचा काहीही परिणाम होणार नाही, असा दावा काँग्रेसनं केलाकाँग्रेसचे खासदार फ्रान्सिस्को सार्दिन्हा म्हणतात, कभी नही होगा, लोगो को बीजेपी का नेचर मालुम है. सभको मालुम है उनका हिडन अजेंडा क्या है.भाजप बरोबर सहभागी असलेले अपक्ष निवडून आले तर गोव्यात धनाढ्य असलेली मायनिंग लॉबी. शहा कमिशनचा रिपोर्ट स्वत:च्या ताकतीवर18-20 जागा मिळासला हव्यात. घराणेशाही आणि मायनिंग घोटाळ्यात अडकलेल्या काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी अनेक सामाजिक संघटनाही गोव्यात सक्रिय झाल्यात. या काँग्रेसविरोधी वातावरणाचा भाजपला फायदा उठवता येतो का, हे बघायचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2012 05:49 PM IST

गोव्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

दिनेश केळुसकर,पणजी

01 मार्च

गोवा विधानसभेच्या निवडणुकीचाही प्रचार आज संपला. शनिवारी एकाच टप्प्यात गोव्यात मतदान होतं आहे. काँग्रेस आणि भाजप दोघांनीही आप आपले दिग्गज नेते या प्रचारात उतरवले. भाजपने यावेळी पहिल्यांदाच सहा ख्रिश्चन उमेदवारांना तिकीट दिलंय. तर भाजपाची ही धर्मनिरपेक्षता केवळ देखावा असल्याचं काँग्रेसने म्हटलंय.

अवघ्या 40 आमदारांच्या विधानसभेसाठी गोव्यात 74 अपक्ष उमेदवारांसह तब्बल 215 रिंगणात आहेत. सत्तेच्या गणितासाठी भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशीयुती करत 4 अपक्षांनांही पाठिंबा दिला. शिवाय ख्रिश्चन मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी 6 कॅथलिक उमेदवारांनाही पहिल्यांदाच तिकीट दिलंय.

भाजपचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर म्हणतात, गेल्या निवडणुकीत कंँथलिक आमच्या नावावर उभे राहायला तयार नव्हते. त्यामुळे यावेळेला कँथलिक समाजातूनही आम्हाला सपोर्ट मिळतोय हे स्पष्ट झालंय.

पण भाजपाच्या या रणनीतीचा काहीही परिणाम होणार नाही, असा दावा काँग्रेसनं केला

काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस्को सार्दिन्हा म्हणतात, कभी नही होगा, लोगो को बीजेपी का नेचर मालुम है. सभको मालुम है उनका हिडन अजेंडा क्या है.भाजप बरोबर सहभागी असलेले अपक्ष निवडून आले तर गोव्यात धनाढ्य असलेली मायनिंग लॉबी. शहा कमिशनचा रिपोर्ट स्वत:च्या ताकतीवर18-20 जागा मिळासला हव्यात. घराणेशाही आणि मायनिंग घोटाळ्यात अडकलेल्या काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी अनेक सामाजिक संघटनाही गोव्यात सक्रिय झाल्यात. या काँग्रेसविरोधी वातावरणाचा भाजपला फायदा उठवता येतो का, हे बघायचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2012 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close