S M L

महापौरपदाच्या अर्जाचा शेवटचा दिवस; 'ठाणे'दार कोण ?

02 मार्चठाण्यात महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यामुळे अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेनेनं केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनंही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहे. शिवसेनेतर्फे महापौरपदासाठी हरिश्चंद्र पाटील तर उपमहापौरपदासाठी मिलिंद पाटणकर यांचं निश्चित झाल्याचं समजतंय. तर राष्ट्रवादीतर्फे नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, मिलिंद पाटील आणि संजय भोईर यांची नावं आघाडीवर आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2012 10:22 AM IST

महापौरपदाच्या अर्जाचा शेवटचा दिवस; 'ठाणे'दार कोण ?

02 मार्च

ठाण्यात महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यामुळे अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेनेनं केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनंही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहे. शिवसेनेतर्फे महापौरपदासाठी हरिश्चंद्र पाटील तर उपमहापौरपदासाठी मिलिंद पाटणकर यांचं निश्चित झाल्याचं समजतंय. तर राष्ट्रवादीतर्फे नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, मिलिंद पाटील आणि संजय भोईर यांची नावं आघाडीवर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2012 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close