S M L

बंगळुरूमध्ये वकिलांचा पत्रकारांवर हल्ला

02 मार्चबंगळुरूमध्ये कोर्टाच्या परिसरातच वकील आणि मीडियामध्ये संघर्ष झाला. सिव्हिल कोर्टाच्या परिसरात येण्यापासून वकिलांनी मीडियाला रोखल्यामुळे वाद निर्माण झाला. वकिलांनी पत्रकारांवरच दगडफेक केली. यात अनेक पत्रकार जखमी झाले. हस्तक्षेप करणार्‍या पोलिसांवरही वकिलांनी दगड आणि बाटल्या फेकल्या. बंगळुरू सेंट्रलचे डीसीपी जी रमेशसुद्धा यात जखमी झाल्याचं समजतंय. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आंदोलन करत असलेल्या वकिलांना पत्रकारांनी प्रश्नं विचारल्यानं संतापलेल्या वकिलांनी ही दगडफेक केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2012 01:19 PM IST

बंगळुरूमध्ये वकिलांचा पत्रकारांवर हल्ला

02 मार्च

बंगळुरूमध्ये कोर्टाच्या परिसरातच वकील आणि मीडियामध्ये संघर्ष झाला. सिव्हिल कोर्टाच्या परिसरात येण्यापासून वकिलांनी मीडियाला रोखल्यामुळे वाद निर्माण झाला. वकिलांनी पत्रकारांवरच दगडफेक केली. यात अनेक पत्रकार जखमी झाले. हस्तक्षेप करणार्‍या पोलिसांवरही वकिलांनी दगड आणि बाटल्या फेकल्या. बंगळुरू सेंट्रलचे डीसीपी जी रमेशसुद्धा यात जखमी झाल्याचं समजतंय. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आंदोलन करत असलेल्या वकिलांना पत्रकारांनी प्रश्नं विचारल्यानं संतापलेल्या वकिलांनी ही दगडफेक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2012 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close