S M L

मुंबईच्या महापौरपदासाठी अर्जाचा शेवटचा दिवस

05 मार्चमुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मातोश्रीवर उमेदवार नक्की करण्यासाठी महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला सुनिल प्रभू उपस्थित आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असलेले राहुल शेवाळे हेदेखील या बैठकीला उपस्थित आहेत. पण महापौरपदासाठी चर्चेत असलेले सुरेंद्र बागलकर हे मात्र या बैठकीला उपस्थित नाही. तर उपमहापौरपदासाठी भाजपचे ज्ञानमूर्ती शर्मा, विठ्ठल खरटमोल आणि मोहन मिठबांवकर यांची नावं आघाडीवर आहेत. दरम्यान, नगरसेवक नाना अंबोले यांच्यासाठी दगडू सकपाळ हे आपल्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मुंबई महापौरपदी सुनील प्रभू यांचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय. सुनील प्रभू हे वॉर्ड नंबर- 48 चे नगरसेवक आहे. सलग तिसर्‍यांदा नगरसेवकपदी निवडून आले आहे. त्याचबरोबर दोन वेळा सभागृह नेत्याचे पद भूषवलं आहे. तर दोन वेळा स्थायी समितीचे अध्यक्षही होते. तर दुसरीकडे उपमहापौरपदासाठी विठ्ठल खरटमोल यांचं नाव निश्चित होऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली. विठ्ठल खरटोमल हे दुसर्‍यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. स्थापत्य समितीचे माजी अध्यक्ष म्हणूनही खरटमोल यांनी काम पाहिलं आहे. तसेच उपमहापौरपदासाठी मोहन मिठबावकर यांच्या नावाची चर्चा आहे. मिठबावकर हे दुसर्‍यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. त्याचबरोरब प्रभाग समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2012 09:36 AM IST

मुंबईच्या महापौरपदासाठी अर्जाचा शेवटचा दिवस

05 मार्च

मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मातोश्रीवर उमेदवार नक्की करण्यासाठी महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला सुनिल प्रभू उपस्थित आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असलेले राहुल शेवाळे हेदेखील या बैठकीला उपस्थित आहेत. पण महापौरपदासाठी चर्चेत असलेले सुरेंद्र बागलकर हे मात्र या बैठकीला उपस्थित नाही. तर उपमहापौरपदासाठी भाजपचे ज्ञानमूर्ती शर्मा, विठ्ठल खरटमोल आणि मोहन मिठबांवकर यांची नावं आघाडीवर आहेत. दरम्यान, नगरसेवक नाना अंबोले यांच्यासाठी दगडू सकपाळ हे आपल्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

मुंबई महापौरपदी सुनील प्रभू यांचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय. सुनील प्रभू हे वॉर्ड नंबर- 48 चे नगरसेवक आहे. सलग तिसर्‍यांदा नगरसेवकपदी निवडून आले आहे. त्याचबरोबर दोन वेळा सभागृह नेत्याचे पद भूषवलं आहे. तर दोन वेळा स्थायी समितीचे अध्यक्षही होते. तर दुसरीकडे उपमहापौरपदासाठी विठ्ठल खरटमोल यांचं नाव निश्चित होऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली.

विठ्ठल खरटोमल हे दुसर्‍यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. स्थापत्य समितीचे माजी अध्यक्ष म्हणूनही खरटमोल यांनी काम पाहिलं आहे. तसेच उपमहापौरपदासाठी मोहन मिठबावकर यांच्या नावाची चर्चा आहे. मिठबावकर हे दुसर्‍यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. त्याचबरोरब प्रभाग समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2012 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close