S M L

शिवसेनेला ठेंगा ; नागपुरात भाजपचा महापौर !

05 मार्चनागपूरच्या महापौरपदी भाजपचे अनिल सोले विराजमान झाले. तर आतापर्यंत शिवसेनेकडे असलेले उपमहापौरपदही आता भाजपनं स्वत: घेऊन शिवसेनेला धक्का दिला आहे. एवढंच नाहीतर शिवसेनेचा पाठिंबा न घेता मनसे आणि मुस्लीम लिगसारख्या पाठिंबा घेत भाजपने नागपुरात सत्ता स्थापन केली आहे. नागपूरमध्ये भाजपनं शिवसेनेशी फारकत घेत मनसेचा हात धरलाय. महापौर आणि उपमहापौरपदावर भाजपनंच आपले उमेदवार बसवले आहे. शिवसेनेकडून उपमहापौरपद हिसकावून घेताना भाजपने स्थानिक आघाडी स्थापन केली. या आघाडीत मनसेचे 2,अपक्ष - 10,भारिप - 2 , बहुजन रिपब्लिकन एकता मंच- 1, लोकभारती - 1 मुस्मिल लीगचे 2 उमेदवार आहे. गडकरींचे शिवसेनेशी संबंध अलीकडे जास्त बिघडलेत. बाळासाहेब फोनही उचलत नाहीत असं ते नाराजीनं बोलले होते. आता नागपूरमध्ये गडकरींनी मनसेच्या इंजिनाला डबे जोडल्यामुळे शिवसेना कमालीची नाराज झाली आहे. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत नितीन गडकरींनी स्वत: लक्ष घातलं होतं. 2014 लोकसभा निवडणूकही ते या आघाडीच्या मदतीने नागपूरमधून लढवू शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सेनेला दूर करताना गडकरींनी संघ मुख्यालयाच्या शहरात मुस्लीम लीगची मदत घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2012 09:52 AM IST

शिवसेनेला ठेंगा ; नागपुरात भाजपचा महापौर !

05 मार्च

नागपूरच्या महापौरपदी भाजपचे अनिल सोले विराजमान झाले. तर आतापर्यंत शिवसेनेकडे असलेले उपमहापौरपदही आता भाजपनं स्वत: घेऊन शिवसेनेला धक्का दिला आहे. एवढंच नाहीतर शिवसेनेचा पाठिंबा न घेता मनसे आणि मुस्लीम लिगसारख्या पाठिंबा घेत भाजपने नागपुरात सत्ता स्थापन केली आहे.

नागपूरमध्ये भाजपनं शिवसेनेशी फारकत घेत मनसेचा हात धरलाय. महापौर आणि उपमहापौरपदावर भाजपनंच आपले उमेदवार बसवले आहे. शिवसेनेकडून उपमहापौरपद हिसकावून घेताना भाजपने स्थानिक आघाडी स्थापन केली. या आघाडीत मनसेचे 2,अपक्ष - 10,भारिप - 2 , बहुजन रिपब्लिकन एकता मंच- 1, लोकभारती - 1 मुस्मिल लीगचे 2 उमेदवार आहे.

गडकरींचे शिवसेनेशी संबंध अलीकडे जास्त बिघडलेत. बाळासाहेब फोनही उचलत नाहीत असं ते नाराजीनं बोलले होते. आता नागपूरमध्ये गडकरींनी मनसेच्या इंजिनाला डबे जोडल्यामुळे शिवसेना कमालीची नाराज झाली आहे. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत नितीन गडकरींनी स्वत: लक्ष घातलं होतं. 2014 लोकसभा निवडणूकही ते या आघाडीच्या मदतीने नागपूरमधून लढवू शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सेनेला दूर करताना गडकरींनी संघ मुख्यालयाच्या शहरात मुस्लीम लीगची मदत घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2012 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close