S M L

मुंबईच्या महापौरपदी सुनील प्रभू !

05 मार्चमुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आणि महायुतीच्या वतीनं महापौरपदासाठी सुनिल प्रभू यांची उमेदवारी निश्चित झाली आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत गोरेगावचे सुनील प्रभू आणि गिरगावचे सुरेंद्र बागलकर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण यात गोरेगावकर सुनील प्रभू यांनी बाजी मारली आहेत. सुनील प्रभू हे वॉर्ड नंबर- 48 चे नगरसेवक आहे. सलग तिसर्‍यांदा नगरसेवकपदी निवडून आले आहे. त्याचबरोबर दोन वेळा सभागृह नेत्याचे पद भूषवलं आहे. तर दोन वेळा स्थायी समितीचे अध्यक्षही होते. तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राहुल शेवाळे आणि सभागृह नेतेपदासाठी यशोधर फणसे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. बोरीवलीच्या वॉर्ड क्र 15 इथून नगरसेवक म्हणून निवडून आलेले भाजपचे मोहन मिठबांवकर यांना उपमहापौरपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. मिठबांवकर यांच्यासोबत ज्ञानमूर्ती शर्मा, विठ्ठल खरटमोल यांचीही नावं आघाडीवर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2012 10:43 AM IST

मुंबईच्या महापौरपदी सुनील प्रभू !

05 मार्च

मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आणि महायुतीच्या वतीनं महापौरपदासाठी सुनिल प्रभू यांची उमेदवारी निश्चित झाली आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत गोरेगावचे सुनील प्रभू आणि गिरगावचे सुरेंद्र बागलकर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण यात गोरेगावकर सुनील प्रभू यांनी बाजी मारली आहेत. सुनील प्रभू हे वॉर्ड नंबर- 48 चे नगरसेवक आहे. सलग तिसर्‍यांदा नगरसेवकपदी निवडून आले आहे. त्याचबरोबर दोन वेळा सभागृह नेत्याचे पद भूषवलं आहे. तर दोन वेळा स्थायी समितीचे अध्यक्षही होते. तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राहुल शेवाळे आणि सभागृह नेतेपदासाठी यशोधर फणसे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. बोरीवलीच्या वॉर्ड क्र 15 इथून नगरसेवक म्हणून निवडून आलेले भाजपचे मोहन मिठबांवकर यांना उपमहापौरपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. मिठबांवकर यांच्यासोबत ज्ञानमूर्ती शर्मा, विठ्ठल खरटमोल यांचीही नावं आघाडीवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2012 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close