S M L

ठाण्याच्या 'नाण्या'साठी वाटेल ते..!

05 मार्च'ठाणे शिवसेनेचं खणखणीत नाणं' असं बिरुद सिध्द करुन दाखवणार्‍या शिवसेनेच्या गोटात भाजपच्या खजिन्यातून एक 'नाणं' गायब झाल्यामुळे कमालीची धाकधूक ऐकू येऊ लागली आहे. याचे परिणाम मागील दोन दिवसात ठाणेकरांनी 'याची देही याचा डोळा' अनुभवला आहे. तर दुसरीकडे निवडणुकीअगोदरपासून फोडाफोडीच्या राजकारणात 'सौ सोनार की,एक लोहार की'असं उत्तर देणार्‍या राष्ट्रवादीने रचलेल्या व्यूहरचनेत जनतेचा संताप ओढावून घेतला आहे. पण काही हो ठाण्याला कोणाला हात लावू देणार नाही असा पवित्राच महायुतीने घेतलाय. कालचा संपात जनतेचे हाल झाल्यानंतर पुन्हा एकदा सेनेनं मोर्च्याचे हत्यार उपसले. पण या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. केवळ सभेला परवानगी देण्यात आली.'शिवसेना ठाण्याची, ठाण्याची शिवसेना' असं समिकरण कायम ठेवत महापालिका निवडणुकीत ठाण्यात सर्वाधिक जागेवर निवडून येत महायुतीने ठाणे आपलंच असल्याचा दावा करत विरोधाकांच्या गाडीतली हवाच काढून घेतली. पण शिवसेनेचं खणखणीत 'नाणं' चोरता कसा येईल यासाठी विरोधांकानी डाव रचला. भाजपच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे अचानक पती, मुलासह बेपत्ता झाल्यात. शोधाशोध घेऊन सुध्दा काही सुगाव न लागल्यामुळे अखेर भाजपने राष्ट्रवादीकडे बोट दाखवतं थेट जितेंद्र आव्हाड यांच्यावर 'हल्ला' केला. पण आव्हाडांनी भाजपचे सर्व आरोप धुडकावून लावले. लोखंडेबाईंचा काही शोध लागत नसल्यामुळे महायुतीच्या गोटात आणखी धाकधूक वाढली. शोधन थकलेल्या शिवसैनिकांनी एकच हल्लाबोल केला. टीएमटी, खासगी वाहनाची तोडफोड केली. आणि रविवारीच्या दिवशी शिवसेनेनं कडकडीत ठाणे बंद पुकारला. बंद झाला पण यामुळे ठाणेकरांनी विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागला. ऐवढ होऊन सुध्दा लोखंडेबाईंचा शोध न लागल्यामुळे महायुतीने महामोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. पण सध्या सुरु असलेल्या दहावीच्या परीक्षामुळे पोलिसांनी परवानगी दिली नाही. केवळ सभेला परवानगी देण्यात आली. त्याचबरोबर बेपत्ता सुहासिनी लोखंडे यांना कोर्टात उपस्थित करावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे. यासाठी हेबियस कॉर्पस ही दाखल करण्यात आली आहे. उद्या महापौरपदासाठी निवड होणार आहे त्यातच बेपत्ता नगरसेविका यामुळे महायुतीच्या शिलेदारांनी जंग छेडली आहे. उद्याच्या महापौर निवडीसाठी सुहासिनी लोखंडे हजर होणार की नाही यांची चिंता आता महायुतीत वाढत चालली आहे.ठाण्यात महापौर कोणाचा ?बहुमताचा आकडा-66- शिवसेना- 53- भाजप-08- आरपीआय-01- महायुती- 62- राष्ट्रवादी- 34 - काँग्रेस- 18- आघाडी-52पक्षीय बलाबल- महायुती- 66- आघाडी-52- मनसे- 07- अपक्ष-07- बसप-02

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2012 06:16 PM IST

ठाण्याच्या 'नाण्या'साठी वाटेल ते..!

05 मार्च

'ठाणे शिवसेनेचं खणखणीत नाणं' असं बिरुद सिध्द करुन दाखवणार्‍या शिवसेनेच्या गोटात भाजपच्या खजिन्यातून एक 'नाणं' गायब झाल्यामुळे कमालीची धाकधूक ऐकू येऊ लागली आहे. याचे परिणाम मागील दोन दिवसात ठाणेकरांनी 'याची देही याचा डोळा' अनुभवला आहे. तर दुसरीकडे निवडणुकीअगोदरपासून फोडाफोडीच्या राजकारणात 'सौ सोनार की,एक लोहार की'असं उत्तर देणार्‍या राष्ट्रवादीने रचलेल्या व्यूहरचनेत जनतेचा संताप ओढावून घेतला आहे. पण काही हो ठाण्याला कोणाला हात लावू देणार नाही असा पवित्राच महायुतीने घेतलाय. कालचा संपात जनतेचे हाल झाल्यानंतर पुन्हा एकदा सेनेनं मोर्च्याचे हत्यार उपसले. पण या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. केवळ सभेला परवानगी देण्यात आली.'शिवसेना ठाण्याची, ठाण्याची शिवसेना' असं समिकरण कायम ठेवत महापालिका निवडणुकीत ठाण्यात सर्वाधिक जागेवर निवडून येत महायुतीने ठाणे आपलंच असल्याचा दावा करत विरोधाकांच्या गाडीतली हवाच काढून घेतली. पण शिवसेनेचं खणखणीत 'नाणं' चोरता कसा येईल यासाठी विरोधांकानी डाव रचला. भाजपच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे अचानक पती, मुलासह बेपत्ता झाल्यात. शोधाशोध घेऊन सुध्दा काही सुगाव न लागल्यामुळे अखेर भाजपने राष्ट्रवादीकडे बोट दाखवतं थेट जितेंद्र आव्हाड यांच्यावर 'हल्ला' केला. पण आव्हाडांनी भाजपचे सर्व आरोप धुडकावून लावले. लोखंडेबाईंचा काही शोध लागत नसल्यामुळे महायुतीच्या गोटात आणखी धाकधूक वाढली. शोधन थकलेल्या शिवसैनिकांनी एकच हल्लाबोल केला. टीएमटी, खासगी वाहनाची तोडफोड केली. आणि रविवारीच्या दिवशी शिवसेनेनं कडकडीत ठाणे बंद पुकारला. बंद झाला पण यामुळे ठाणेकरांनी विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागला.

ऐवढ होऊन सुध्दा लोखंडेबाईंचा शोध न लागल्यामुळे महायुतीने महामोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. पण सध्या सुरु असलेल्या दहावीच्या परीक्षामुळे पोलिसांनी परवानगी दिली नाही. केवळ सभेला परवानगी देण्यात आली. त्याचबरोबर बेपत्ता सुहासिनी लोखंडे यांना कोर्टात उपस्थित करावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे. यासाठी हेबियस कॉर्पस ही दाखल करण्यात आली आहे. उद्या महापौरपदासाठी निवड होणार आहे त्यातच बेपत्ता नगरसेविका यामुळे महायुतीच्या शिलेदारांनी जंग छेडली आहे. उद्याच्या महापौर निवडीसाठी सुहासिनी लोखंडे हजर होणार की नाही यांची चिंता आता महायुतीत वाढत चालली आहे.

ठाण्यात महापौर कोणाचा ?

बहुमताचा आकडा-66

- शिवसेना- 53- भाजप-08- आरपीआय-01- महायुती- 62

- राष्ट्रवादी- 34 - काँग्रेस- 18- आघाडी-52

पक्षीय बलाबल- महायुती- 66- आघाडी-52- मनसे- 07- अपक्ष-07- बसप-02

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2012 06:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close