S M L

आयोगाच्या चुकीमुळे पराभूत उमेदवार विजयी

05 मार्चउस्मानाबाद जिल्हयात निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे पराभूत उमेदवाराला विजयी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कळम तालुक्यातील मोहा जिल्हा परिषद जागेवर शिवसेनेच्या सविता कोरे यांचा पराभव झाला. तर राष्ट्रवादीच्या दिपा माने यांना विजयी घोषित करण्यात आलं. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या एव्हीएम मशीन ऐवजी पंचायत समितीची एव्हीम मशीनची मतमोजणी निवडणूक कर्मचार्‍यांनी केली होती. त्यामुळे हा प्रकार घडला. पराभूत उमेदवार कोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागितली चौकशीनंतर ही बाब उघडकीस आली. मात्र तरीही निवडणूक अधिकार्‍यांनी न्यायालयात जाण्याचा चुकीचा सल्ला दिला. उस्मानाबाचे जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी या प्रकाराची माहिती मुंबई निवडणूक विभागाला दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2012 04:44 PM IST

आयोगाच्या चुकीमुळे पराभूत उमेदवार विजयी

05 मार्च

उस्मानाबाद जिल्हयात निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे पराभूत उमेदवाराला विजयी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कळम तालुक्यातील मोहा जिल्हा परिषद जागेवर शिवसेनेच्या सविता कोरे यांचा पराभव झाला. तर राष्ट्रवादीच्या दिपा माने यांना विजयी घोषित करण्यात आलं. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या एव्हीएम मशीन ऐवजी पंचायत समितीची एव्हीम मशीनची मतमोजणी निवडणूक कर्मचार्‍यांनी केली होती. त्यामुळे हा प्रकार घडला. पराभूत उमेदवार कोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागितली चौकशीनंतर ही बाब उघडकीस आली. मात्र तरीही निवडणूक अधिकार्‍यांनी न्यायालयात जाण्याचा चुकीचा सल्ला दिला. उस्मानाबाचे जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी या प्रकाराची माहिती मुंबई निवडणूक विभागाला दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2012 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close