S M L

चावीवाला बनला उपमहापौर !

06 मार्चसोलापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अलका राठोड तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे हारुन सय्यद यांची निवड झाली. अलका राठोड या बंजारा समाजाच्या आहेत तर हारुन हे महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. या दोन्ही पदांसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली होती. तर उपमहापौरपदी निवडून आलेले हरुन सय्यद हे महापालिकेत पाणी सोडणारा चावीवाला या पदावर काम करतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आणि आता तर ते चक्क सोलापूरचे उपमहापौरही बनले आहे. 'देणेवाला जब भी देता देता छप्पर फाडके...' सोलापूरमधल्या हारुन सय्यदच्याबाबतीत सध्या नेमकं हेच घडलं आहे. नशिबानं दिलं आणि तेही भरभरुन... सोलापूर महापालिकेत चावीवाला म्हणून गेली 19 वर्ष ते नोकरी करत आहे. पण 17 फेब्रुवारी 2012 ला त्याच्या आयुष्यानं एक वेगळं वळण घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्यानं प्रभाग क्रमांक 50 मधून निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुध्दा. नोकरीचा राजीनामा देऊन निवडणूक लढणार्‍या हारुनची सुरुवातीला चेष्टा झाली. पण राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी हारुनच्या जिद्दीला साथ दिली. महापौर आरिफ शेख यांचे भाऊ आणि विद्यमान नगरसेवक तौफिक शेख यांच्या त्यानं चक्क हजारहून अधिक मतांनी पराभव केला. आता हारुन सय्यदसमोर एकच ध्येय आहे ते म्हणजे शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याचं.प्रचार करताना हारुननं सर्वसामान्य लोकांशी थेट संवाद साधला. आणि घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागितला आणि मतदारांनीही हारुनच्या झोळीत भरभरुन मतं टाकली. पक्षाने टाकलेला विश्वास हारुननं सार्थ करुन दाखवला. राजकारण म्हणजे सर्वसामान्यांचा खेळ नाही असं नेहमीच म्हटलं जातं. पण याला सर्वसामान्यांपैकीच एक असेला हारुन सय्यद अपवाद ठरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2012 11:27 AM IST

चावीवाला बनला उपमहापौर !

06 मार्च

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अलका राठोड तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे हारुन सय्यद यांची निवड झाली. अलका राठोड या बंजारा समाजाच्या आहेत तर हारुन हे महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. या दोन्ही पदांसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली होती. तर उपमहापौरपदी निवडून आलेले हरुन सय्यद हे महापालिकेत पाणी सोडणारा चावीवाला या पदावर काम करतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आणि आता तर ते चक्क सोलापूरचे उपमहापौरही बनले आहे.

'देणेवाला जब भी देता देता छप्पर फाडके...' सोलापूरमधल्या हारुन सय्यदच्याबाबतीत सध्या नेमकं हेच घडलं आहे. नशिबानं दिलं आणि तेही भरभरुन... सोलापूर महापालिकेत चावीवाला म्हणून गेली 19 वर्ष ते नोकरी करत आहे. पण 17 फेब्रुवारी 2012 ला त्याच्या आयुष्यानं एक वेगळं वळण घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्यानं प्रभाग क्रमांक 50 मधून निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुध्दा.

नोकरीचा राजीनामा देऊन निवडणूक लढणार्‍या हारुनची सुरुवातीला चेष्टा झाली. पण राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी हारुनच्या जिद्दीला साथ दिली. महापौर आरिफ शेख यांचे भाऊ आणि विद्यमान नगरसेवक तौफिक शेख यांच्या त्यानं चक्क हजारहून अधिक मतांनी पराभव केला. आता हारुन सय्यदसमोर एकच ध्येय आहे ते म्हणजे शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याचं.

प्रचार करताना हारुननं सर्वसामान्य लोकांशी थेट संवाद साधला. आणि घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागितला आणि मतदारांनीही हारुनच्या झोळीत भरभरुन मतं टाकली. पक्षाने टाकलेला विश्वास हारुननं सार्थ करुन दाखवला. राजकारण म्हणजे सर्वसामान्यांचा खेळ नाही असं नेहमीच म्हटलं जातं. पण याला सर्वसामान्यांपैकीच एक असेला हारुन सय्यद अपवाद ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2012 11:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close