S M L

पेट्रोल 5 रुपयांनी महागणार ?

06 मार्चपाच राज्याच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत नाही तेच पुन्हा एकदा पेट्रोलदरवाढीनं डोकंवर काढलं आहे. पेट्रोल प्रतिलिटर 5 रुपयानं महाग होण्याची शक्यता आहे. याबाबत तेलकंपन्यांनी 5 रुपये वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. सरकारने मागणी मंजूर केली तर ही दरवाढ होऊ शकते. आंतराष्ट्रीय बाजारात रुपायाची घसरण आणि बॅरेलमागे वाढणार्‍या किंमतीमुळे पेट्रोल कंपन्याना याचा फटका बसतोय. यामुळे दर महिन्याला करोडो रुपयांचा तोटा कंपन्यांना सहन करावा लागत आहे. डिसेंबर महिन्यापासून टाळत आलेल्या पेट्रोल दरवाढीमुळे कंपन्यांनी अखेर निवडणुकांचे निकाल लागताच सरकारकडे धाव घेतली. पेट्रोलमध्ये एक,नाही दोन नाही तर थेट पाच रुपयांनी वाढवावे असा आग्रह सरकारकडे धरला आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2012 03:41 PM IST

पेट्रोल 5 रुपयांनी महागणार ?

06 मार्च

पाच राज्याच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत नाही तेच पुन्हा एकदा पेट्रोलदरवाढीनं डोकंवर काढलं आहे. पेट्रोल प्रतिलिटर 5 रुपयानं महाग होण्याची शक्यता आहे. याबाबत तेलकंपन्यांनी 5 रुपये वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. सरकारने मागणी मंजूर केली तर ही दरवाढ होऊ शकते. आंतराष्ट्रीय बाजारात रुपायाची घसरण आणि बॅरेलमागे वाढणार्‍या किंमतीमुळे पेट्रोल कंपन्याना याचा फटका बसतोय. यामुळे दर महिन्याला करोडो रुपयांचा तोटा कंपन्यांना सहन करावा लागत आहे. डिसेंबर महिन्यापासून टाळत आलेल्या पेट्रोल दरवाढीमुळे कंपन्यांनी अखेर निवडणुकांचे निकाल लागताच सरकारकडे धाव घेतली. पेट्रोलमध्ये एक,नाही दोन नाही तर थेट पाच रुपयांनी वाढवावे असा आग्रह सरकारकडे धरला आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2012 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close