S M L

सातपुड्यात आदिवासींच्या होळीचा उत्सव

07 मार्चआदिवासी समाजातील महत्वाचा सण म्हणजे होळी. सातपुड्यातील बारेला आणि पावरा समाज मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. यंदाची होळी ही येत्या 11 मार्चला सातपुड्यातील तिसर्‍या पुड्यातील खारेपाडा इथं होणार आहे. सध्या आदिवासींच्या उत्साहाचं प्रतीक असलेला भोगर्‍या बाजार सातपुड्याच्या कुशीत सुरु आहे. राजस्थानच्या पावागड पासून ते उत्तर महाराष्ट्रातील सातपुड्यापर्यंत विखुरलेले आदिवासी या भोंगर्‍यानिमीत्त सातपुड्यात जमा झाले आहे. या भोगर्‍यांच्या बाजारात आपली वार्षिक खरेदी आदिवासी करतात. प्रत्येक गावाचा मानाचा ढोल हे या भोगर्‍याचं वैशिष्ठ्य. तालवाद्यांच्या तालावर बेभान होत महिला,पुरुष सगळेच या भोंगर्‍यात हजेरी लावतात. आपल्या गावाचं वेगळं वैशिष्ठ्य जपण्याच्या प्रयत्न या तालवाद्याच्या माध्यमातून हा पावरा,बारेला समाज करतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2012 07:58 AM IST

सातपुड्यात आदिवासींच्या होळीचा उत्सव

07 मार्च

आदिवासी समाजातील महत्वाचा सण म्हणजे होळी. सातपुड्यातील बारेला आणि पावरा समाज मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. यंदाची होळी ही येत्या 11 मार्चला सातपुड्यातील तिसर्‍या पुड्यातील खारेपाडा इथं होणार आहे. सध्या आदिवासींच्या उत्साहाचं प्रतीक असलेला भोगर्‍या बाजार सातपुड्याच्या कुशीत सुरु आहे. राजस्थानच्या पावागड पासून ते उत्तर महाराष्ट्रातील सातपुड्यापर्यंत विखुरलेले आदिवासी या भोंगर्‍यानिमीत्त सातपुड्यात जमा झाले आहे. या भोगर्‍यांच्या बाजारात आपली वार्षिक खरेदी आदिवासी करतात. प्रत्येक गावाचा मानाचा ढोल हे या भोगर्‍याचं वैशिष्ठ्य. तालवाद्यांच्या तालावर बेभान होत महिला,पुरुष सगळेच या भोंगर्‍यात हजेरी लावतात. आपल्या गावाचं वेगळं वैशिष्ठ्य जपण्याच्या प्रयत्न या तालवाद्याच्या माध्यमातून हा पावरा,बारेला समाज करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2012 07:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close