S M L

मुंबईच्या महापौरपदी सुनील प्रभू

09 मार्चमुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने 107 जागा जिंकत आपली सत्ता 17 व्या वर्षीही कायम राखली. आज मुंबईच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या सुनील प्रभू यांची निवड झाली आहेत. त्यांनी आघाडीच्या सुनील मोरे यांचा पराभव केला. सुनील प्रभू यांनी 125मत मिळाली तर सुनील मोरे यांना 65 मत मिळाली. महायुतीकडून शिवसेनेचे सुनील प्रभू यांची निवड होणार हे निश्चित मानलं जात होतं. त्यामुळे आजची निवडणूक केवळ औपचारिकता होती. शिवसेनेला बहुमताचा आखडा गाठण्यासाठी 7 मतांची गरज होती. यावेळी सुनील प्रभू यांना 9 अपक्षांचा पाठिंबा मिळाला. अरुण कांबळे,दिपक हांडे, मोहम्मद शेख, विष्णु गायकवाड, लीना शुक्ल, विजय तांडेल,गीता गवळी,वंदना गवळी या अपक्षांनी पाठिंबा दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2012 05:26 PM IST

मुंबईच्या महापौरपदी सुनील प्रभू

09 मार्च

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने 107 जागा जिंकत आपली सत्ता 17 व्या वर्षीही कायम राखली. आज मुंबईच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या सुनील प्रभू यांची निवड झाली आहेत. त्यांनी आघाडीच्या सुनील मोरे यांचा पराभव केला. सुनील प्रभू यांनी 125मत मिळाली तर सुनील मोरे यांना 65 मत मिळाली. महायुतीकडून शिवसेनेचे सुनील प्रभू यांची निवड होणार हे निश्चित मानलं जात होतं. त्यामुळे आजची निवडणूक केवळ औपचारिकता होती. शिवसेनेला बहुमताचा आखडा गाठण्यासाठी 7 मतांची गरज होती. यावेळी सुनील प्रभू यांना 9 अपक्षांचा पाठिंबा मिळाला. अरुण कांबळे,दिपक हांडे, मोहम्मद शेख, विष्णु गायकवाड, लीना शुक्ल, विजय तांडेल,गीता गवळी,वंदना गवळी या अपक्षांनी पाठिंबा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2012 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close