S M L

जमिनीसाठी आजी-आजोबांना दमदाटी !

अद्वैत मेहता, पुणे 07 मार्चपुण्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांवर दबाव टाकून त्यांना घाबरूवून जमिनी बळकावण्याचे प्रकार वाढत आहे. महापालिका प्रशासन असो की, पोलीस यंत्रणा ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींकडे कानाडोळा करत आहे. बाणेर भागातील वयाच्या पंच्याहत्तरीतलं उच्चशिक्षित जोडप्याला सध्या हाच अनूभव येतोय.झपाट्याने वाढणार्‍या पुण्यातील बाणेर भागात हेमा आणि हेमकांत केणी यांनी 1992 साली पुसाळकर बिल्डरकडून अर्धा एकर जमीन घेतली. मूळचे मुंबईकर केणी दांपत्यनंतर इंग्लंडमध्ये सेटल झालं. निवृत्तीनंतर पुण्यातल्या जागेवर त्यांनी बंगला बांधला. गेल्या काही दिवस केणींना स्थानिक गुंडांनी त्रास द्यायला सुरवात केलीय. बंगल्याच्या ऍप्रोच रोडवर अतिक्रमण करून कोंडी करण्याच प्रयत्न मल्हारी ऊर्फ एकनाथ सायकर करतोय असा आरोप केणींनी केला.याप्रकरणी केणींची जागा हडप करायचा कसलाही इरादा नाही असं सांगत सायकरांनी सर्व आरोप फेटाळलेत. झोपडीचं अतिक्रमण पाडायलाही आपली हरकत नसल्याच त्यांचं म्हणणं आहे. पुण्यात जागांचे भाव वाढतायत. त्याबरोबरच जमिनी बळकावण्याचे प्रकारही वाढतायत. केणी दांपत्य घाबरलेलं नाही तर निर्भिडपणे आवाज उठवतंय. प्रशासकीय यंत्रणा याची दखल घेतील का, हाच प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2012 05:06 PM IST

जमिनीसाठी आजी-आजोबांना दमदाटी !

अद्वैत मेहता, पुणे

07 मार्च

पुण्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांवर दबाव टाकून त्यांना घाबरूवून जमिनी बळकावण्याचे प्रकार वाढत आहे. महापालिका प्रशासन असो की, पोलीस यंत्रणा ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींकडे कानाडोळा करत आहे. बाणेर भागातील वयाच्या पंच्याहत्तरीतलं उच्चशिक्षित जोडप्याला सध्या हाच अनूभव येतोय.

झपाट्याने वाढणार्‍या पुण्यातील बाणेर भागात हेमा आणि हेमकांत केणी यांनी 1992 साली पुसाळकर बिल्डरकडून अर्धा एकर जमीन घेतली. मूळचे मुंबईकर केणी दांपत्यनंतर इंग्लंडमध्ये सेटल झालं. निवृत्तीनंतर पुण्यातल्या जागेवर त्यांनी बंगला बांधला. गेल्या काही दिवस केणींना स्थानिक गुंडांनी त्रास द्यायला सुरवात केलीय. बंगल्याच्या ऍप्रोच रोडवर अतिक्रमण करून कोंडी करण्याच प्रयत्न मल्हारी ऊर्फ एकनाथ सायकर करतोय असा आरोप केणींनी केला.

याप्रकरणी केणींची जागा हडप करायचा कसलाही इरादा नाही असं सांगत सायकरांनी सर्व आरोप फेटाळलेत. झोपडीचं अतिक्रमण पाडायलाही आपली हरकत नसल्याच त्यांचं म्हणणं आहे. पुण्यात जागांचे भाव वाढतायत. त्याबरोबरच जमिनी बळकावण्याचे प्रकारही वाढतायत. केणी दांपत्य घाबरलेलं नाही तर निर्भिडपणे आवाज उठवतंय. प्रशासकीय यंत्रणा याची दखल घेतील का, हाच प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2012 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close