S M L

नाशिकमध्ये अपक्ष शिवसेनेच्या वाटेवर !

08 मार्चनाशिक महापालिकेत शिवसेनेनं मनसेला जोरदार धक्का दिला आहे.अपक्ष आणि भाजपचं समर्थन गृहीत धरुन जनराज्यच्या 2 जागाही त्यांनी खिशात टाकल्या आहेत. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापण्यासाठी महत्वाच्या असलेल्या 6 अपक्षांच्या विकास आघाडीशीही सेना नेत्यांनी चर्चा केली आहे.अरविंद सावंत यांनी प्रत्यक्ष तर सेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी दूरध्वनीवरुन या अपक्षांशी चर्चा केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बंडखोर असलेल्या अपक्षांच्या आघाडीनं विकासाच्या मुद्दावर सेनेला समर्थन देण्याची तयारी दाखवली आहे. ठाण्यात जरी मनसेनं पाठिंबा दिला तरी नाशिकची सत्ता आमचीच हा दावा सेनेनं केला आहे. नाशिकमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पाहुया आतापर्यंत कोणत्या पक्षातल्या किती उमेदवारांनी अर्ज भरले ?मनसेतर्फे - महापौर पदासाठी - शशीकांत जाधव, ऍड. यतीन वाघ तर उपमहापौर पदासाठी - अशोक मुर्तडक, आर. डी. धोंडगेभाजपतर्फे - उपमहापौर पदासाठी - सतीश कुलकर्णी माकपतर्फे - महापौर आणि उपमहापौरपदासाठी - तानाजी जायभावेराष्ट्रवादीतर्फे - महापौरपदासाठी - शिवाजी चुंबळे, कविता कर्डकनाशिक पक्षीय बलाबल मनसे -40शिवसेना-19भाजप-14राष्ट्रवादी -20 काँग्रेस -15आरपीआय -3सीपीएम -3जनराज्य आघाडी-2अपक्ष-6 (यातील 3 काँग्रेस,3 राष्ट्रवादी बंडखोर)

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2012 09:07 AM IST

नाशिकमध्ये अपक्ष शिवसेनेच्या वाटेवर !

08 मार्च

नाशिक महापालिकेत शिवसेनेनं मनसेला जोरदार धक्का दिला आहे.अपक्ष आणि भाजपचं समर्थन गृहीत धरुन जनराज्यच्या 2 जागाही त्यांनी खिशात टाकल्या आहेत. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापण्यासाठी महत्वाच्या असलेल्या 6 अपक्षांच्या विकास आघाडीशीही सेना नेत्यांनी चर्चा केली आहे.अरविंद सावंत यांनी प्रत्यक्ष तर सेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी दूरध्वनीवरुन या अपक्षांशी चर्चा केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बंडखोर असलेल्या अपक्षांच्या आघाडीनं विकासाच्या मुद्दावर सेनेला समर्थन देण्याची तयारी दाखवली आहे. ठाण्यात जरी मनसेनं पाठिंबा दिला तरी नाशिकची सत्ता आमचीच हा दावा सेनेनं केला आहे.

नाशिकमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पाहुया आतापर्यंत कोणत्या पक्षातल्या किती उमेदवारांनी अर्ज भरले ?

मनसेतर्फे - महापौर पदासाठी - शशीकांत जाधव, ऍड. यतीन वाघ तर उपमहापौर पदासाठी - अशोक मुर्तडक, आर. डी. धोंडगेभाजपतर्फे - उपमहापौर पदासाठी - सतीश कुलकर्णी माकपतर्फे - महापौर आणि उपमहापौरपदासाठी - तानाजी जायभावेराष्ट्रवादीतर्फे - महापौरपदासाठी - शिवाजी चुंबळे, कविता कर्डक

नाशिक पक्षीय बलाबल

मनसे -40शिवसेना-19भाजप-14राष्ट्रवादी -20 काँग्रेस -15आरपीआय -3सीपीएम -3जनराज्य आघाडी-2अपक्ष-6 (यातील 3 काँग्रेस,3 राष्ट्रवादी बंडखोर)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2012 09:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close