S M L

धारावीत 148 जणांना 'रंगबाधा'

08 मार्चधुळवडीचा उत्साह साजरा होत असताना मुंबईत गालबोट लागले. रंग खेळताना 148 च्यावर मुलांना रंगांची बाधा झाली. बाधा झालेल्या मुलांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही सर्व मुलं शास्त्रीनगर, कल्याणवाडी, बाल्कनी चाळ, होळी मैदान , नाईन्टी फीट या भागात राहणारी आहेत. होळी खेळल्यानंतर आंघोळ करण्यासाठी ही सगळी मुलं गेली असताना अंगावर या रंगांची रिऍक्शन आली. ज्यामुळे चक्कर येणं, अंगात त्राण न उरणं, बेशुद्ध पडणे अशा तक्रारी या मुलांनी केल्यात. ही बाब लक्षात येताच एकच धावपळ उडाली. सर्व मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, महिला आणि बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. ज्या भागातून रंग विकत घेण्यात आले होते, तिथल्या दुकानदारांची चौक शी करण्यात येणार आहे. मुलांपैकी अनेकांची प्रकृती सुधारत आहे तर काहीजणांना आज संध्याकाळपर्यंत सुट्टी देण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2012 03:05 PM IST

धारावीत 148 जणांना 'रंगबाधा'

08 मार्च

धुळवडीचा उत्साह साजरा होत असताना मुंबईत गालबोट लागले. रंग खेळताना 148 च्यावर मुलांना रंगांची बाधा झाली. बाधा झालेल्या मुलांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही सर्व मुलं शास्त्रीनगर, कल्याणवाडी, बाल्कनी चाळ, होळी मैदान , नाईन्टी फीट या भागात राहणारी आहेत. होळी खेळल्यानंतर आंघोळ करण्यासाठी ही सगळी मुलं गेली असताना अंगावर या रंगांची रिऍक्शन आली. ज्यामुळे चक्कर येणं, अंगात त्राण न उरणं, बेशुद्ध पडणे अशा तक्रारी या मुलांनी केल्यात. ही बाब लक्षात येताच एकच धावपळ उडाली. सर्व मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, महिला आणि बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. ज्या भागातून रंग विकत घेण्यात आले होते, तिथल्या दुकानदारांची चौक शी करण्यात येणार आहे. मुलांपैकी अनेकांची प्रकृती सुधारत आहे तर काहीजणांना आज संध्याकाळपर्यंत सुट्टी देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2012 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close