S M L

स्कूल बसला ब्रेक ; राज्यव्यापी बेमुदत संप

09 मार्चस्कूल बस ओनर्स असोसिएशन (सोबा) नं आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. याविरोधात अनेक पालक संघटनांनी जाहीर निषेध व्यक्त केला. दहावी आणि बारवीच्या परीक्षा सध्या सुरु आहेत, त्यामुळे अशावेळी स्कूल बसनी संप पुकारणं म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांची छळवणूकच आहे, अशा शब्दात फोरमचे जयंत जैन यांनी या संपाविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारने गेल्या वर्षी 'स्कूल बस सेफ्टी पॉलिसी' जाहीर केली. पण ही पॉलिसी स्कूल बस मालकांसाठी जाचक असल्याचं सांगून असोसिएशन त्याविरोधात संप पुकारला. गेल्या चार महिन्यातला स्कूल बस चालकांनी पुकारलेला हा चौथा संप आहे. स्कूल बस सेफ्टी पॉलिसीमधल्या 23 मुद्यांपैकी 17 मुद्दे स्कुलबस ओनर्स असोशिएशनने मान्य केले आहेत. पण, उरलेल्या सहा मुद्याच्या अंमलबजावणीबाबत असोशिएशनला आक्षेप आहेत. राज्य सरकारने स्थापन केलेल्या तांत्रिक समितीने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या शिफारशी राज्य सरकारने स्विकाराव्या अशी मागणीही स्कूल बस ओनर्स असोशिएशननं केली. मुंबईसोबतच नवी मुंबईतही संपाचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसतोय. पुण्यात मात्र संपाला पाठिंबा मिळाला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2012 10:30 AM IST

स्कूल बसला ब्रेक ; राज्यव्यापी बेमुदत संप

09 मार्च

स्कूल बस ओनर्स असोसिएशन (सोबा) नं आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. याविरोधात अनेक पालक संघटनांनी जाहीर निषेध व्यक्त केला. दहावी आणि बारवीच्या परीक्षा सध्या सुरु आहेत, त्यामुळे अशावेळी स्कूल बसनी संप पुकारणं म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांची छळवणूकच आहे, अशा शब्दात फोरमचे जयंत जैन यांनी या संपाविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारने गेल्या वर्षी 'स्कूल बस सेफ्टी पॉलिसी' जाहीर केली. पण ही पॉलिसी स्कूल बस मालकांसाठी जाचक असल्याचं सांगून असोसिएशन त्याविरोधात संप पुकारला.

गेल्या चार महिन्यातला स्कूल बस चालकांनी पुकारलेला हा चौथा संप आहे. स्कूल बस सेफ्टी पॉलिसीमधल्या 23 मुद्यांपैकी 17 मुद्दे स्कुलबस ओनर्स असोशिएशनने मान्य केले आहेत. पण, उरलेल्या सहा मुद्याच्या अंमलबजावणीबाबत असोशिएशनला आक्षेप आहेत. राज्य सरकारने स्थापन केलेल्या तांत्रिक समितीने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या शिफारशी राज्य सरकारने स्विकाराव्या अशी मागणीही स्कूल बस ओनर्स असोशिएशननं केली. मुंबईसोबतच नवी मुंबईतही संपाचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसतोय. पुण्यात मात्र संपाला पाठिंबा मिळाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2012 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close