S M L

कसोटीतून राहुल द्रविड निवृत्त ?

08 मार्चभारताची 'द वॉल' राहुल द्रविड क्रिकेटला शेवटचा रामराम ठोकण्याची शक्यता आहे. उद्या बंगळुरुमध्ये त्याने पत्रकार परिषद बोलावली. आणि तिथं तो टेस्टमधून निवृत्तीची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात राहुल द्रविडची कामगिरी चांगली झाली नव्हती. भारतीय टीमला तर व्हाईटवॉश मिळाला. शिवाय द्रविडने स्वत: आठ इनिंगमध्ये 194 रन्स केलेत. त्याचं ऍव्हरेज 24 रन्सचं होतं. शिवाय सीरिजमध्ये द्रविड रेकॉर्ड सहावेळा क्लीनबोल्ड झाला. त्याच्या आणि एकूणच सीनिअर खेळाडूंच्या कामगिरीवर सगळीकडून टीकेची झोड उठली होती. त्यामुळे द्रविडची ही पत्रकार परिषद निवृत्तीच्या घोषणेसाठीच आहे असा अंदाज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2012 11:58 AM IST

कसोटीतून राहुल द्रविड निवृत्त ?

08 मार्च

भारताची 'द वॉल' राहुल द्रविड क्रिकेटला शेवटचा रामराम ठोकण्याची शक्यता आहे. उद्या बंगळुरुमध्ये त्याने पत्रकार परिषद बोलावली. आणि तिथं तो टेस्टमधून निवृत्तीची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात राहुल द्रविडची कामगिरी चांगली झाली नव्हती. भारतीय टीमला तर व्हाईटवॉश मिळाला. शिवाय द्रविडने स्वत: आठ इनिंगमध्ये 194 रन्स केलेत. त्याचं ऍव्हरेज 24 रन्सचं होतं. शिवाय सीरिजमध्ये द्रविड रेकॉर्ड सहावेळा क्लीनबोल्ड झाला. त्याच्या आणि एकूणच सीनिअर खेळाडूंच्या कामगिरीवर सगळीकडून टीकेची झोड उठली होती. त्यामुळे द्रविडची ही पत्रकार परिषद निवृत्तीच्या घोषणेसाठीच आहे असा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2012 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close