S M L

ज्येष्ठ अभिनेते जॉय मुखर्जी यांचं निधन

09 मार्चप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते जॉय मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होते. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. सोमवारपासूनच त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. 1960 पासून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली.अनेक सिनेमांत त्यांनी रोमँटिक भुमिका केल्या. लव्ह इन टोकियो, शागिर्द, एक मुसाफिर एक हसीना, जिद्दी अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केलंय. जास्तीत जास्त सिनेमे त्यांनी आशा पारेख यांच्यासोबत केले आहे. त्यांनी हमसाया सिनेमा दिग्दर्शित आणि प्रोड्युसही केला होता. राजेश खन्ना आणि झीनत अमानचा छलिया बाबू सिनेमांचं दिग्दर्शनही केलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2012 11:57 AM IST

ज्येष्ठ अभिनेते जॉय मुखर्जी यांचं निधन

09 मार्च

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते जॉय मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होते. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. सोमवारपासूनच त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. 1960 पासून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली.अनेक सिनेमांत त्यांनी रोमँटिक भुमिका केल्या. लव्ह इन टोकियो, शागिर्द, एक मुसाफिर एक हसीना, जिद्दी अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केलंय. जास्तीत जास्त सिनेमे त्यांनी आशा पारेख यांच्यासोबत केले आहे. त्यांनी हमसाया सिनेमा दिग्दर्शित आणि प्रोड्युसही केला होता. राजेश खन्ना आणि झीनत अमानचा छलिया बाबू सिनेमांचं दिग्दर्शनही केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2012 11:57 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close