S M L

मृत व्यक्तीची चौकशी करताय पोलीस

10 मार्चरायगड जिल्ह्यात 20 वर्षापूर्वी निधन झालेल्या अब्दुल गनी अब्दुल्ला मेस्त्री यांना मुंबई पोलिसांकडून एका खंडणीच्या प्रकरणात तपासलं जातंय. मुंबईतल्या समता नगर मधील एका बांधकाम प्रोजेक्ट संदर्भात गेल्यावर्षी गनी भाई नामक व्यक्तीने खंडणी मागितल्याची गोष्ट समोर आली होती. यासंदर्भात मुरुडच्या मेस्त्री कुटुंबाची चेंबूर पोलिसांकडून सातत्याने चौकशी केली जात आहे. मुळचे मुरुडचे असणारे अब्दुल गनी अब्दुल्ला मेस्त्री हे टेलर होते. 20 वर्षांपुर्वी वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या या चौकशीमुळे आपली नाहक बदनामी होत असल्याचा आरोप मेस्त्री कुटुंबीयांनी केला. या संदर्भात अलिबाग पोलिसांना विचारले असता या प्रकरणाची यांना माहिती नसल्याचं सांगितलं जातंय. तर चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी प्रतिक्रीया द्यायला नकार दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2012 12:15 PM IST

मृत व्यक्तीची चौकशी करताय पोलीस

10 मार्च

रायगड जिल्ह्यात 20 वर्षापूर्वी निधन झालेल्या अब्दुल गनी अब्दुल्ला मेस्त्री यांना मुंबई पोलिसांकडून एका खंडणीच्या प्रकरणात तपासलं जातंय. मुंबईतल्या समता नगर मधील एका बांधकाम प्रोजेक्ट संदर्भात गेल्यावर्षी गनी भाई नामक व्यक्तीने खंडणी मागितल्याची गोष्ट समोर आली होती. यासंदर्भात मुरुडच्या मेस्त्री कुटुंबाची चेंबूर पोलिसांकडून सातत्याने चौकशी केली जात आहे. मुळचे मुरुडचे असणारे अब्दुल गनी अब्दुल्ला मेस्त्री हे टेलर होते. 20 वर्षांपुर्वी वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या या चौकशीमुळे आपली नाहक बदनामी होत असल्याचा आरोप मेस्त्री कुटुंबीयांनी केला. या संदर्भात अलिबाग पोलिसांना विचारले असता या प्रकरणाची यांना माहिती नसल्याचं सांगितलं जातंय. तर चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी प्रतिक्रीया द्यायला नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2012 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close