S M L

घोषणा होऊन 4 वर्ष उलटली पुणे स्टेशन जैसे थे !

अद्वैत मेहता, पुणे13 मार्चरोज 1 लाख प्रवासांची वर्दळ असलेल्या पुणे रेल्वे स्टेशनला वर्ल्ड क्लास स्टेशनचा दर्जा देण्याची घोषणा होऊन 4 वर्षं उलटली. तरी अजूनही याची अंमलबजावणी झालेली नाही. दुसरीकडे पुणे मुंबई प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन गाडी सुरू करणे, गाड्यांच्या फेर्‍या वाढवणे आणि जादा डबे जोडणे या मागण्यांकडेही रेल्वे मंत्र्यांनी कानाडोळा केला आहे. पुण्याहुन सुटणार्‍या रेल्वेगाड्यांची संख्या दरवर्षी वाढत असली तरी स्टेशनवरील सुविधांमध्ये वाढ मात्र झाली नाही. पुणे स्टेशनहून दररोज तब्बल 170 गाड्या आणि सुमारे 1 लाख 10 हजार प्रवासी ये-जा करतात. पण तरीही पुण्याच्या काही मुख्य मागण्यांकडे रेल्वे मंत्र्यांनी पाठचं फिरवली आहे. पुणे स्टेशन जागतिक दर्जाचे करण्यासाठी 4 वर्षांपूर्वी 400 कोटी रूपयांची तरतूद बजेटमध्ये केली गेली खरी पण सुविधांची गाडी मात्र काही पुढे सरकलीच नाही. पुणे मुंबई दररोज प्रवास करणारे हजारे नोकरदार प्रवासी आहेत. पण सकाळी तीन गाड्या मुंबईला रवाना झाल्यानंतर एकदम दुपारी गाडी असल्याने प्रवाशांची अडचण होते. त्याचबरोबर महिला प्रवाशांच्या जादा डब्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष केलं गेलंय. पुणे - नागपूर गरीबरथ, पुणे - हावडा दुरांतो अशा गाड्या तर सुरु झाल्या. पण पुणे - अहमदाबाद बुलेट ट्रेन, पुणे - नाशिक ट्रेन यांचे प्रस्ताव मात्र धुळखात पडले आहेत. त्याचबरोबर मेट्रोचंही घोडं अर्ध्यातचं अडलंय. त्यामुळे यावेळी तरी पुणेकरांच्या मागण्या मान्य होणार की पुन्हा एकदा रेल्वे बजेट पुणेकरांकडे पाठ फिरवणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2012 10:52 AM IST

घोषणा होऊन 4 वर्ष उलटली पुणे स्टेशन जैसे थे !

अद्वैत मेहता, पुणे

13 मार्च

रोज 1 लाख प्रवासांची वर्दळ असलेल्या पुणे रेल्वे स्टेशनला वर्ल्ड क्लास स्टेशनचा दर्जा देण्याची घोषणा होऊन 4 वर्षं उलटली. तरी अजूनही याची अंमलबजावणी झालेली नाही. दुसरीकडे पुणे मुंबई प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन गाडी सुरू करणे, गाड्यांच्या फेर्‍या वाढवणे आणि जादा डबे जोडणे या मागण्यांकडेही रेल्वे मंत्र्यांनी कानाडोळा केला आहे.

पुण्याहुन सुटणार्‍या रेल्वेगाड्यांची संख्या दरवर्षी वाढत असली तरी स्टेशनवरील सुविधांमध्ये वाढ मात्र झाली नाही. पुणे स्टेशनहून दररोज तब्बल 170 गाड्या आणि सुमारे 1 लाख 10 हजार प्रवासी ये-जा करतात. पण तरीही पुण्याच्या काही मुख्य मागण्यांकडे रेल्वे मंत्र्यांनी पाठचं फिरवली आहे. पुणे स्टेशन जागतिक दर्जाचे करण्यासाठी 4 वर्षांपूर्वी 400 कोटी रूपयांची तरतूद बजेटमध्ये केली गेली खरी पण सुविधांची गाडी मात्र काही पुढे सरकलीच नाही.

पुणे मुंबई दररोज प्रवास करणारे हजारे नोकरदार प्रवासी आहेत. पण सकाळी तीन गाड्या मुंबईला रवाना झाल्यानंतर एकदम दुपारी गाडी असल्याने प्रवाशांची अडचण होते. त्याचबरोबर महिला प्रवाशांच्या जादा डब्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष केलं गेलंय.

पुणे - नागपूर गरीबरथ, पुणे - हावडा दुरांतो अशा गाड्या तर सुरु झाल्या. पण पुणे - अहमदाबाद बुलेट ट्रेन, पुणे - नाशिक ट्रेन यांचे प्रस्ताव मात्र धुळखात पडले आहेत. त्याचबरोबर मेट्रोचंही घोडं अर्ध्यातचं अडलंय. त्यामुळे यावेळी तरी पुणेकरांच्या मागण्या मान्य होणार की पुन्हा एकदा रेल्वे बजेट पुणेकरांकडे पाठ फिरवणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2012 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close