S M L

पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या मोहिनी लांडे

13 मार्चपिंपरी चिंचवडच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहिनी लांडे यांची तर उपमहापौैरपदी राजू मिसळ यांची निवड झाली आहे. आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनेही आपले उमेदवार उभे केले होते. पण ऐनवेळी भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उरले. अखेर बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शिवसेनेच्या शारदा बाबर आणि धनंजय आल्हाट या दोन्ही उमेदवारांना पराभूत करुन विजय मिळवला. मोहिनी लांडे ह्या अपक्ष आमदार विलास लांडे ह्यांच्या पत्नी आहेत. आपण शहरातील समस्या सोडवणार असल्याचं आश्वासन यावेळी नवनिर्वाचित महापौरांनी दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2012 04:46 PM IST

पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या मोहिनी लांडे

13 मार्च

पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहिनी लांडे यांची तर उपमहापौैरपदी राजू मिसळ यांची निवड झाली आहे. आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनेही आपले उमेदवार उभे केले होते. पण ऐनवेळी भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उरले. अखेर बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शिवसेनेच्या शारदा बाबर आणि धनंजय आल्हाट या दोन्ही उमेदवारांना पराभूत करुन विजय मिळवला. मोहिनी लांडे ह्या अपक्ष आमदार विलास लांडे ह्यांच्या पत्नी आहेत. आपण शहरातील समस्या सोडवणार असल्याचं आश्वासन यावेळी नवनिर्वाचित महापौरांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2012 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close