S M L

उद्या ठरणार नाशिकाचा महापौर

14 मार्चसंपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक उद्या होतेय. गेल्या काही दिवसात यासंदर्भात नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींना वेग आला. विशेष म्हणजे यात प्रत्येक राजकीय पक्षाच्या रणनीतीची अक्षरशः कसोटी लागलीय. मनसेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा मिळणार अशी कालची घडामोड होती. पण अजूनही भाजपला यामुद्यावरुन शिवसेना आणि मनसेला एकत्र आणण्यात यश आलेलं नाही. उद्यावर ही निवडणूक येऊन ठेपलीय. आत्तापर्यंत महापौरपदाच्या रिंगणात एकूण 11 उमेदवार आहेत, तर उपमहापौरपदाच्या स्पर्धेत 9 जण आहेत. नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा क्लायमॅक्स आता जवळ आलाय. उद्या अकरा वाजता स्पष्ट होईल की नाशिकचा महापौर कोण होणार.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2012 12:34 PM IST

उद्या ठरणार नाशिकाचा महापौर

14 मार्च

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक उद्या होतेय. गेल्या काही दिवसात यासंदर्भात नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींना वेग आला. विशेष म्हणजे यात प्रत्येक राजकीय पक्षाच्या रणनीतीची अक्षरशः कसोटी लागलीय. मनसेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा मिळणार अशी कालची घडामोड होती. पण अजूनही भाजपला यामुद्यावरुन शिवसेना आणि मनसेला एकत्र आणण्यात यश आलेलं नाही. उद्यावर ही निवडणूक येऊन ठेपलीय. आत्तापर्यंत महापौरपदाच्या रिंगणात एकूण 11 उमेदवार आहेत, तर उपमहापौरपदाच्या स्पर्धेत 9 जण आहेत. नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा क्लायमॅक्स आता जवळ आलाय. उद्या अकरा वाजता स्पष्ट होईल की नाशिकचा महापौर कोण होणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2012 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close