S M L

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये 'रडारडी'

13 मार्चउत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून विजय बहुगुणा यांनी आज संध्याकाळी शपथ घेतली. पण मुख्यमंत्रीदावरून उत्तराखंड काँग्रेसमध्ये आज मोठं नाट्य पाहायला मिळालं. विजय बहुगुणा यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्यामुळे केंद्रीय मंत्री हरीश रावत कमालीचे नाराज झाले. त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला. आणि मंत्रिपद सोडण्याचा इशारा दिला. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी हरीश रावत आणि विजय बहुगुणा यांना तातडीनं दिल्लीला बोलावून घेतलं. पण, काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विजय बहुगुणाच मुख्यमंत्री बनणार असल्याचं हायकमांडनी स्पष्ट केलं. हरीश रावत आणि त्यांच्या समर्थकांनी बहुगुणा यांच्या शपथविधी समारंभावर बहिष्कार टाकला. हरीश रावत भाजपच्या संपर्कात आहेत अशी चर्चासुद्धा सुरू झाली. पण, काँग्रेसमध्ये राहूनच अन्यायाविरोधात लढत राहू असं रावत यांनी स्पष्ट केलंय. मी काँग्रेसची बालिका वधू आहे असं वक्तव्यही रावत यांनी केलंय. दरम्यान, रावत यांचा राग दूर करू, असं विजय बहगुणा यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2012 06:19 PM IST

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन  काँग्रेसमध्ये 'रडारडी'

13 मार्च

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून विजय बहुगुणा यांनी आज संध्याकाळी शपथ घेतली. पण मुख्यमंत्रीदावरून उत्तराखंड काँग्रेसमध्ये आज मोठं नाट्य पाहायला मिळालं. विजय बहुगुणा यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्यामुळे केंद्रीय मंत्री हरीश रावत कमालीचे नाराज झाले. त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला. आणि मंत्रिपद सोडण्याचा इशारा दिला. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी हरीश रावत आणि विजय बहुगुणा यांना तातडीनं दिल्लीला बोलावून घेतलं. पण, काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विजय बहुगुणाच मुख्यमंत्री बनणार असल्याचं हायकमांडनी स्पष्ट केलं. हरीश रावत आणि त्यांच्या समर्थकांनी बहुगुणा यांच्या शपथविधी समारंभावर बहिष्कार टाकला. हरीश रावत भाजपच्या संपर्कात आहेत अशी चर्चासुद्धा सुरू झाली. पण, काँग्रेसमध्ये राहूनच अन्यायाविरोधात लढत राहू असं रावत यांनी स्पष्ट केलंय. मी काँग्रेसची बालिका वधू आहे असं वक्तव्यही रावत यांनी केलंय. दरम्यान, रावत यांचा राग दूर करू, असं विजय बहगुणा यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2012 06:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close