S M L

अखेर नाशिकमध्ये मनसेचाच महापौर

15 मार्चअखेर नाशिकची 'सुभेदारी' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मिळाली. भाजपने दिलेल्या पाठिंब्यामुळे मनसेनं पहिला महापौर नाशिकमध्ये झाला. मनसेचे यतीन वाघ यांना 56 मतं मिळाली आणि राज ठाकरे यांनी नाशिककरांना दिलेला शब्द अखेर खरा केला. भाजपनं व्हिप जाहीर करुन मनसेला आपला पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तटस्थ राहिले.तर उपमहापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी विजयी झाले आहेत. त्यांना 56 मतं मिळाली.नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत मनसेनं सर्वाधिक 40 जागा जिंकून मनसेचाच महापौर होईल असं खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं. आणि अखेर नाशिककरांना दिलेला शब्द राज यांनी सत्यात उतरवून दाखवला. मध्यंतरी राज यांच्या घोषणेमुळे आपल्याच 'किल्ल्यात' महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी उडी घेतली. रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी भुजबळांची भेट घेऊन महायुतीचाच महापौर होईल असा प्रस्ताव महायुतीपर्यंत पोहचवला. नाशकात पुणे पॅटर्न येईल अशी दाट शक्यता निर्माण झाली. पण ऐन ठाण्यात महापौरपदासाठी पेटलेलं 'रान' थंड करण्यासाठी मनसेनं शिवसेनाला पाठिंबा देत महापौरपदाचा 'राज'मार्ग मोकळा करुन दिला. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना मनसेला पाठिंबा देईल अशी शक्यता निर्माण झाली पण भाजपने विधानसभा निवडणुका लक्षात घेत थेट राज यांच्याशी हातमिळवणी केली आणि मनसेला पाठिंबा देत नाशकात मनसेचा 'वाघ' महापौरपदावर विराजमान झाला. मात्र सख्यासोबतीने दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने आपल्याला धोका दिला अशी प्रतिक्रीया शिवसेनेच्या शिलेदारांनी दिली. मात्र 'राजकारण हे राजकारण असते तुमचे आणि आमचे एक सारखेच असते' असं सिध्द झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2012 09:10 AM IST

अखेर नाशिकमध्ये मनसेचाच महापौर

15 मार्च

अखेर नाशिकची 'सुभेदारी' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मिळाली. भाजपने दिलेल्या पाठिंब्यामुळे मनसेनं पहिला महापौर नाशिकमध्ये झाला. मनसेचे यतीन वाघ यांना 56 मतं मिळाली आणि राज ठाकरे यांनी नाशिककरांना दिलेला शब्द अखेर खरा केला. भाजपनं व्हिप जाहीर करुन मनसेला आपला पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तटस्थ राहिले.तर उपमहापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी विजयी झाले आहेत. त्यांना 56 मतं मिळाली.

नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत मनसेनं सर्वाधिक 40 जागा जिंकून मनसेचाच महापौर होईल असं खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं. आणि अखेर नाशिककरांना दिलेला शब्द राज यांनी सत्यात उतरवून दाखवला. मध्यंतरी राज यांच्या घोषणेमुळे आपल्याच 'किल्ल्यात' महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी उडी घेतली. रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी भुजबळांची भेट घेऊन महायुतीचाच महापौर होईल असा प्रस्ताव महायुतीपर्यंत पोहचवला. नाशकात पुणे पॅटर्न येईल अशी दाट शक्यता निर्माण झाली. पण ऐन ठाण्यात महापौरपदासाठी पेटलेलं 'रान' थंड करण्यासाठी मनसेनं शिवसेनाला पाठिंबा देत महापौरपदाचा 'राज'मार्ग मोकळा करुन दिला. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना मनसेला पाठिंबा देईल अशी शक्यता निर्माण झाली पण भाजपने विधानसभा निवडणुका लक्षात घेत थेट राज यांच्याशी हातमिळवणी केली आणि मनसेला पाठिंबा देत नाशकात मनसेचा 'वाघ' महापौरपदावर विराजमान झाला. मात्र सख्यासोबतीने दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने आपल्याला धोका दिला अशी प्रतिक्रीया शिवसेनेच्या शिलेदारांनी दिली. मात्र 'राजकारण हे राजकारण असते तुमचे आणि आमचे एक सारखेच असते' असं सिध्द झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2012 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close