S M L

आठवलेंना ठेंगा ;अनिल देसाईंना राज्यसभेची उमेदवारी

15 मार्चराज्यसभेसाठी शिवसेनेकडून सचिवपदी असलेल्या अनिल देसाईंना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट होतंय. महायुतीत आल्यानंतर आरपीआय नेते रामदास आठवलेंनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती पण देसाईंना उमेदवारी दिल्याने आठवलेंचीही संधी हुकली आहे.रिपाइंचे नेते रामदास आठवले शिवसेनेसोबत जाणार अशी चर्चा सुरु होताच रामदास आठवले यांना या 'सोबती'मुळे काय मिळाणार ? अशी चर्चा रंगली असतानाच रामदास आठवले यांना मनोहर जोशी यांची राज्यसभेतील जागा मिळणार अशी चर्चा एका बाजूला रंगली होती. आठवले यानीही खुद्द राज्यसभेची जागा आपल्याला मिळणार अशी कबुली आयबीएन लोकमतकडे दिली होती. पण अचानक कुठे तरी माशी शिंकली आणि राज्यसभेची उमेदवारी अनिल देसाई यांना मिळाली. तर मनोहर जोशी यांची राज्यसभेतील जागा एप्रिल महिन्यात खाली होणार होती पण त्याअगोदरच महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा 'दादरचा गड' पडल्यामुळे सरांकडे पराभवाचे बोट दाखवण्यात आले. त्यामुळे सरांचं काय होणार असं वादळ उठलं असताना मातोश्रीवर 'बैठका' घेतल्यानंतर प्रकरण जिकडेतिकडे झाले. पण महायुतीतला पालिका निवडणुकीत युतीला 'निळी' ताकद देणार्‍या रामदास आठवले यांना जागा न मिळाल्यामुळे काय भुमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2012 06:08 PM IST

आठवलेंना ठेंगा ;अनिल देसाईंना राज्यसभेची उमेदवारी

15 मार्च

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून सचिवपदी असलेल्या अनिल देसाईंना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट होतंय. महायुतीत आल्यानंतर आरपीआय नेते रामदास आठवलेंनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती पण देसाईंना उमेदवारी दिल्याने आठवलेंचीही संधी हुकली आहे.

रिपाइंचे नेते रामदास आठवले शिवसेनेसोबत जाणार अशी चर्चा सुरु होताच रामदास आठवले यांना या 'सोबती'मुळे काय मिळाणार ? अशी चर्चा रंगली असतानाच रामदास आठवले यांना मनोहर जोशी यांची राज्यसभेतील जागा मिळणार अशी चर्चा एका बाजूला रंगली होती. आठवले यानीही खुद्द राज्यसभेची जागा आपल्याला मिळणार अशी कबुली आयबीएन लोकमतकडे दिली होती. पण अचानक कुठे तरी माशी शिंकली आणि राज्यसभेची उमेदवारी अनिल देसाई यांना मिळाली. तर मनोहर जोशी यांची राज्यसभेतील जागा एप्रिल महिन्यात खाली होणार होती पण त्याअगोदरच महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा 'दादरचा गड' पडल्यामुळे सरांकडे पराभवाचे बोट दाखवण्यात आले. त्यामुळे सरांचं काय होणार असं वादळ उठलं असताना मातोश्रीवर 'बैठका' घेतल्यानंतर प्रकरण जिकडेतिकडे झाले. पण महायुतीतला पालिका निवडणुकीत युतीला 'निळी' ताकद देणार्‍या रामदास आठवले यांना जागा न मिळाल्यामुळे काय भुमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2012 06:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close