S M L

रत्नागिरीचे सिग्नल धूळ खात आहेत

22 नोव्हेंबर रत्नागिरीसिटिझन जर्नलिस्ट सतीश मुळेवाहतूक सुरळीत व्हावी म्हणून शहरात मोठा गाजावाजा करून सिग्नल यंत्रणा उभारल्या जातात. पण रत्नागिरी शहरात उभारलेली सिग्नल यंत्रणा आज अक्षरशः धूळ खात पडून आहे. सिग्नल फुटलेत. खांबांवर वेली चढल्या आहेत आणि वाहतूक पोलिसांचा पत्ता नाही अशी इथल्या सिग्नल यंत्रणेची अवस्था झाली आहे. या अंदाधुंदीला, वैतागलेल्या रत्नागिरीकरांचा प्रश्न मांडत आहेत सिटिझन जर्नलिस्ट सतीश मुळेपाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत रत्नागिरी नगर परिषदेने सहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी केली. पण गेल्या कित्येक दिवसांपासून सर्व सिग्नल बंद आहेत. सिग्नल बंदमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो आहे असं इथले नागरिक सांगतात. लोकांच्या कररूपी पैशांवर हे सिग्नल उभारले होते. पण आता गेले कित्येक दिवस हे सिग्नल बंद असल्यामुळे जनतेचा पैसा वाया गेला असंच म्हणावं लागेल. याबाबत रत्नागिरी नगरपरिषदेच्या अधिका-यांना विचारलं असता, अधिकारी सांगतात सिग्नल यंत्रणा ज्या कंपनीने उभारली होती. ती कंपनी आता बंद झाली आहे. त्यामुळे आता नव्या कंपनीच्या हातात व्यवहार जाई पर्यंत सिग्नल यंत्रणा बंदच असणार आहे. म्हणजे रत्नागिरीवासियांना सद्यातरी अशा त्रासातून जावं लागणार आहे हे मात्र निश्चित.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2008 03:05 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2008 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close