S M L

कांदाप्रश्नी राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

19 मार्चनाशिकमध्ये कांदाप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. कांद्याबद्दलचं राज्य सरकारचं धोरण स्पष्ट होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठणार नाही असा निर्धार खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार रस्ता रोखून धरला. अधिवेशनात सरकारने कांदा धोरण जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कांद्याची बाजार हस्तक्षेप योजना या अधिवेशनात त्वरीत लागू करावी या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यलयासमोर भर रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुरु केलं आहे. खासदार राजू शेट्टी हे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले आहे. जोपर्यंत हा प्रश्न राज्य सरकार मंजूर करून केंद्राकडे पाठवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार शेट्टी यांनी केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2012 12:08 PM IST

कांदाप्रश्नी राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

19 मार्च

नाशिकमध्ये कांदाप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. कांद्याबद्दलचं राज्य सरकारचं धोरण स्पष्ट होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठणार नाही असा निर्धार खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार रस्ता रोखून धरला. अधिवेशनात सरकारने कांदा धोरण जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

कांद्याची बाजार हस्तक्षेप योजना या अधिवेशनात त्वरीत लागू करावी या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यलयासमोर भर रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुरु केलं आहे. खासदार राजू शेट्टी हे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले आहे. जोपर्यंत हा प्रश्न राज्य सरकार मंजूर करून केंद्राकडे पाठवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार शेट्टी यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2012 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close