S M L

सिटीग्रुपच्या विक्रम पंडित याचं पद धोक्यात

22 नोव्हेंबर सिटीग्रुप बँक सध्या मोठ्या आर्थिक अडचणींमध्ये सापडली आहे. आणि आता खुद्द सिटीग्रुपचे भारतीय वंशाचे सीईओ विक्रम पंडित यांनादेखील कॉस्टकटिंगचा फटका बसू शकतो.विक्रम पंडित यांना काढून टाकण्याबाबत कंपनीचं संचालक मंडळ विचार करत असल्याची बातमी न्यूयॉर्क टाईम्सनं दिली आहे. विक्रम पंडित यांची नियुक्ती गेल्यावर्षीच करण्यात आली होती. मंदीच्या संकटानं सिटीग्रुपलाही घेरलं आहे. त्यामुळे नव्या योजना आखताना विक्रम पंडित यांच्याऐवजी नवा प्रमुख नेमण्याच्या शक्यतेपर्यंत सिटीग्रुप बँक विचार करीत आहे. कंपनीचा काही हिस्सा विकण्याचाही पर्याय सिटीग्रुपच्या संचालक मंडळानं विचारात घेतला आहे अशी बातमी सद्या चर्चेत आहे. त्यासाठी मॉर्गन स्टॅनली, गोल्डमन सॅक्स किंवा स्टेट स्ट्रीट बँकेशी बोलणी होण्याची शक्यता आहे. मात्र सिटीग्रुपच्या अधिका-यांनी या शक्यता नाकारल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2008 02:45 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2008 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close