S M L

टॅक्सीचा प्रवास आजपासून 1 रुपयाने महागला

19 मार्चमुंबई टॅक्सीचालकांनी केलेल्या घोषणेप्रमाणे आजपासून टॅक्सीच्या प्रवास भाड्यात 1 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. याची घोषणा 13 मार्चला करण्यात आली होती. आजपासून टॅक्सीचं किमान भाडं आता 16 रुपयांवरुन 17 रुपये करण्यात आलं आहे. सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे ही भाडेवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. आता टॅक्सी भाडं सुरुवातीला 16 रुपयांवरुन 17 रुपये होईल, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरमागे 50 पैसे वाढवण्यात आले आहेत. टॅक्सी असोसिएशनं 20 रुपये भाडेवाढ मागितली होती. पण सरकारने फक्त एक रुपये भाडे वाढ दिल्याचे टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष ए.एल.क्वॉड्रोस यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2012 02:32 PM IST

टॅक्सीचा प्रवास आजपासून 1 रुपयाने महागला

19 मार्च

मुंबई टॅक्सीचालकांनी केलेल्या घोषणेप्रमाणे आजपासून टॅक्सीच्या प्रवास भाड्यात 1 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. याची घोषणा 13 मार्चला करण्यात आली होती. आजपासून टॅक्सीचं किमान भाडं आता 16 रुपयांवरुन 17 रुपये करण्यात आलं आहे. सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे ही भाडेवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. आता टॅक्सी भाडं सुरुवातीला 16 रुपयांवरुन 17 रुपये होईल, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरमागे 50 पैसे वाढवण्यात आले आहेत. टॅक्सी असोसिएशनं 20 रुपये भाडेवाढ मागितली होती. पण सरकारने फक्त एक रुपये भाडे वाढ दिल्याचे टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष ए.एल.क्वॉड्रोस यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2012 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close