S M L

मुंडेंचे समर्थक अमरसिंह पंडित राष्ट्रवादीत

19 मार्चभाजपचे माजी आमदार आणि गोपिनाथ मुंडे यांचे समर्थक अमरसिंह पंडित यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे. पंडित यांच्या प्रवेशामुळे मुंडे यांच्या सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नाना जबर धक्का बसला आहे. 2009 मध्ये पंडित यांनी भाजपकडून गेवराई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र ते पराभूत झाले. त्यानंतर मुंडे आणि त्यांच्यात मतभेद वाढलेत. जिल्हा परिषद निवडणुकीत पंडित यांनी स्वाभिमानी शेतकरी आघाडीची स्थापना केली आणि जिल्हा परिषदेच्या 5 जागा निवडून आणल्यात. जयदत्त क्षिरसागर यांचे पुतणे संदीप क्षिरसागर यांची अध्यक्षपदावर वर्णी लागण्याची चिन्ह आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2012 02:44 PM IST

मुंडेंचे समर्थक अमरसिंह पंडित राष्ट्रवादीत

19 मार्च

भाजपचे माजी आमदार आणि गोपिनाथ मुंडे यांचे समर्थक अमरसिंह पंडित यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे. पंडित यांच्या प्रवेशामुळे मुंडे यांच्या सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नाना जबर धक्का बसला आहे. 2009 मध्ये पंडित यांनी भाजपकडून गेवराई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र ते पराभूत झाले. त्यानंतर मुंडे आणि त्यांच्यात मतभेद वाढलेत. जिल्हा परिषद निवडणुकीत पंडित यांनी स्वाभिमानी शेतकरी आघाडीची स्थापना केली आणि जिल्हा परिषदेच्या 5 जागा निवडून आणल्यात. जयदत्त क्षिरसागर यांचे पुतणे संदीप क्षिरसागर यांची अध्यक्षपदावर वर्णी लागण्याची चिन्ह आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2012 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close