S M L

सुरेश जैन यांना 30 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

19 मार्चघरकुल घोटाळा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असणारे शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांची पोलीस कोठडी आज संपली आहे. दरम्यान, सुरेश जैन यांना 30 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी आणखी 2 दिवस पोलीस कोठडीची मागणी कोर्टाने फेटाळली. सुरेश जैन यांना अमळनेर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या सुनावणीसाठी जळगांवचे अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन आर क्षीरसागर अमळनेरला पोहोचले होते. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने हा निकाल दिला.प् ाोलिसांच्या विनंतीमुळे कोर्टाची जागा बदलण्यात आली. दरम्यान, सुरेशदादा जैन यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून येत्या 21 तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 29 कोटींचा घरकूल घोटाळा झाल्याची फिर्याद तत्कालिन पालिका आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी 2006 ला दिली होती. मूळ फिर्यादीत सुरेश दादा जैन यांचं आरोपी म्हणून नाव नसताना त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2012 12:16 PM IST

सुरेश जैन यांना 30 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

19 मार्च

घरकुल घोटाळा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असणारे शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांची पोलीस कोठडी आज संपली आहे. दरम्यान, सुरेश जैन यांना 30 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी आणखी 2 दिवस पोलीस कोठडीची मागणी कोर्टाने फेटाळली. सुरेश जैन यांना अमळनेर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या सुनावणीसाठी जळगांवचे अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन आर क्षीरसागर अमळनेरला पोहोचले होते. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने हा निकाल दिला.प् ाोलिसांच्या विनंतीमुळे कोर्टाची जागा बदलण्यात आली. दरम्यान, सुरेशदादा जैन यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून येत्या 21 तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 29 कोटींचा घरकूल घोटाळा झाल्याची फिर्याद तत्कालिन पालिका आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी 2006 ला दिली होती. मूळ फिर्यादीत सुरेश दादा जैन यांचं आरोपी म्हणून नाव नसताना त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2012 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close