S M L

दीदींच्या मागे सरकार !

19 मार्चतृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या दबावामुळे अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचा राजीनामा स्वीकारावा लागला. त्यांच्या जागी मुकुल रॉय उद्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण, रेल्वेची दरवाढ मागे घ्यायलाच हवी, या मागणीवर ममता ठाम आहेत. ममतांचं राजकारण पाहता यूपीए सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसची समाजवादी पक्षासोबत बोलणी सुरू आहेत असंही समजतंय. एनसीटीसी (NCTC) म्हणजेच नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटरच्या मुद्द्यावर आज लोकसभेत भाजपने आणि डाव्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्यांवर मतदान झालं. यावेळी समाजवादी पक्षानं सरकारच्या बाजूनं मतदान केलं. पण सपाने सरकारला बाहेरून पाठिंबा देणार स्पष्ट केलं. तृणमूल काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाने सभात्याग करत सरकारला वाचवलं. त्यामुळे सरकारचा पाय आणखी खोलात गेला आहे.रेल्वेबजेटवर कमालीच्या संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी अखेर दिनेश त्रिवेदांना राजीनामा द्यायला भाग पाडलंच..त्यानंतर त्या पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी संसदेत पोचल्या...त्यांचा अजेंडा स्पष्ट होता. काँग्रेसशी थेट बोलणी.. ममता बॅनजीर्ंच्या हट्टापुढे यूपीए सरकारला झुकावं लागलं. पण पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत बोलताना त्रिवेदींना हटवण्याच्या ममतांच्या निर्णयाबद्दल आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.त्रिवेदी यांच्या जागी मुकुल रॉय यांचं नाव रेल्वेमंत्रीपदी निश्चित झालंय. ममतांच्या या निवडीबद्दलही पंतप्रधान नाराज आहेत. एकीकडे हे दबावाचं राजकारण सुरू असतानाच नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटरच्या मुद्द्यावर भाजपने सुचवलेल्या दुरुस्त्यांवर लोकसभेत मतदान झालं. त्यावेळी तृणमूलच्या खासदारांनी सभात्याग करत अडचणीत आलेल्या यूपीए सरकारचा बचाव केला. सभागृहाच्या बाहेर मात्र ममतांनी आपली नाराजी व्यक्त केली.समाजवादी पक्षाची या सर्व घडामोडींवर बारीक नजर होती. ममतांशी हातमिळवणी करत बसपाच्या खासदारांनीही मतदानावेळी सभात्याग केला. पण, समाजवादी पक्षानं मात्र यूपीएला पाठिंबा देत नव्या समीकरणाची नांदी दिली.यूपीए सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं मुलायम म्हणत असले तरी, दिल्लीत राजकीय घडामोडींना मात्र वेग आला आहे. मुलायमनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचीही भेट घेतली. ममतांनी यूपीएचा पाठिंबा काढून घेतलाच, तर तृणमुलची जागा समाजवादी पक्ष घेऊ शकतो, आणि पडद्यामागे तशी चर्चाही सुरू असल्याचं समजतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2012 04:32 PM IST

दीदींच्या मागे सरकार !

19 मार्च

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या दबावामुळे अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचा राजीनामा स्वीकारावा लागला. त्यांच्या जागी मुकुल रॉय उद्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण, रेल्वेची दरवाढ मागे घ्यायलाच हवी, या मागणीवर ममता ठाम आहेत. ममतांचं राजकारण पाहता यूपीए सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसची समाजवादी पक्षासोबत बोलणी सुरू आहेत असंही समजतंय.

एनसीटीसी (NCTC) म्हणजेच नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटरच्या मुद्द्यावर आज लोकसभेत भाजपने आणि डाव्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्यांवर मतदान झालं. यावेळी समाजवादी पक्षानं सरकारच्या बाजूनं मतदान केलं. पण सपाने सरकारला बाहेरून पाठिंबा देणार स्पष्ट केलं. तृणमूल काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाने सभात्याग करत सरकारला वाचवलं. त्यामुळे सरकारचा पाय आणखी खोलात गेला आहे.

रेल्वेबजेटवर कमालीच्या संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी अखेर दिनेश त्रिवेदांना राजीनामा द्यायला भाग पाडलंच..त्यानंतर त्या पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी संसदेत पोचल्या...त्यांचा अजेंडा स्पष्ट होता. काँग्रेसशी थेट बोलणी.. ममता बॅनजीर्ंच्या हट्टापुढे यूपीए सरकारला झुकावं लागलं. पण पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत बोलताना त्रिवेदींना हटवण्याच्या ममतांच्या निर्णयाबद्दल आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

त्रिवेदी यांच्या जागी मुकुल रॉय यांचं नाव रेल्वेमंत्रीपदी निश्चित झालंय. ममतांच्या या निवडीबद्दलही पंतप्रधान नाराज आहेत. एकीकडे हे दबावाचं राजकारण सुरू असतानाच नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटरच्या मुद्द्यावर भाजपने सुचवलेल्या दुरुस्त्यांवर लोकसभेत मतदान झालं. त्यावेळी तृणमूलच्या खासदारांनी सभात्याग करत अडचणीत आलेल्या यूपीए सरकारचा बचाव केला. सभागृहाच्या बाहेर मात्र ममतांनी आपली नाराजी व्यक्त केली.

समाजवादी पक्षाची या सर्व घडामोडींवर बारीक नजर होती. ममतांशी हातमिळवणी करत बसपाच्या खासदारांनीही मतदानावेळी सभात्याग केला. पण, समाजवादी पक्षानं मात्र यूपीएला पाठिंबा देत नव्या समीकरणाची नांदी दिली.

यूपीए सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं मुलायम म्हणत असले तरी, दिल्लीत राजकीय घडामोडींना मात्र वेग आला आहे. मुलायमनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचीही भेट घेतली. ममतांनी यूपीएचा पाठिंबा काढून घेतलाच, तर तृणमुलची जागा समाजवादी पक्ष घेऊ शकतो, आणि पडद्यामागे तशी चर्चाही सुरू असल्याचं समजतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2012 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close