S M L

विठ्ठल मूर्तीवर संरक्षण लेप प्रक्रीयेला सुरूवात

19 मार्चअठ्ठावीस युगांपासून कमरेवर हात ठेऊन उभा असलेल्या पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या मुर्तीची झीज आणि तिचे संवर्धन हा विषय गेल्या तीन दशकामध्ये तिसर्‍यांदा निर्माण झाला आहे. आता विठ्ठलमूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलं आहे. तर यापुढे झीज टाळण्यासाठी महापूजा, पदस्पर्शदर्शनासाठी विठूरायाची उत्सवमूर्ती बसवण्याबाबत विचार होतो आहे. पण यावर भिन्न मतं व्यक्त होत आहे. विठ्ठलमूर्तीवर संरक्षण लेप देण्याच्या प्रक्रियेला सुरवात झालीय. अभिषेकामुळे मूर्तीमध्ये चिटकलेले दही,दूध आणि मधाचे कण काढण्याचं काम काल करण्यात आलं. मुद्दा समोर आला तो यापुढे होणारी झीज रोखण्याचा. कारण दही दुधाच्या महापूजा, पदस्पर्शदर्शन, आणि डोकं टेकवून दर्शन घेण्याच्या प्रथांमुळे मूर्तीची झीज होते हे यावरुन स्पष्ट झालं. त्यामुळे उत्सवमूर्तीच्या पायांवर चांदीच्या पादुका आणि ऍक्रॅलिकचं आवरण ठेवण्याचा पर्यायही समोर आला आहे. पण यावरुन मतभेद आहेत.याआधी मूतीर्ंची झीज रोखण्यासाठी तत्कालीन मंदिर समितीचे सदस्य शशिकांत पागेंनी महापूजेसाठी उत्सवमूतीर्ंच्या पर्यायाला मंदिर समितीची मान्यताही घेतली होती. मात्र त्यानंतर पागेंनी अचानक राजीनामा दिल्याने हा विषय मागे पडला. पण आता लेपनप्रक्रियेचा मुद्‌दा चर्चेत असताना या पर्यायावरही निर्णय होणं गरजेचं आहे.आयबीएन-लोकमतचे सवाल 1) महापुजेमुळे मूर्तीची झीज होते हे स्पष्ट झाल्यावरही महापुजेचा आग्रह का?2) उत्सवमुर्तीवर अभिषेक आणि महापुजेच्या पर्यायाकडे दुर्लक्ष का?3) किती वेळा करणार लेपनप्रक्रीया, यावरही काही बंधन आहेत का?4) वारकर्‍यांच्या प्रबोधनासाठी पुढाकार का नाही ?

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2012 10:17 AM IST

विठ्ठल मूर्तीवर संरक्षण लेप प्रक्रीयेला सुरूवात

19 मार्च

अठ्ठावीस युगांपासून कमरेवर हात ठेऊन उभा असलेल्या पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या मुर्तीची झीज आणि तिचे संवर्धन हा विषय गेल्या तीन दशकामध्ये तिसर्‍यांदा निर्माण झाला आहे. आता विठ्ठलमूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलं आहे. तर यापुढे झीज टाळण्यासाठी महापूजा, पदस्पर्शदर्शनासाठी विठूरायाची उत्सवमूर्ती बसवण्याबाबत विचार होतो आहे. पण यावर भिन्न मतं व्यक्त होत आहे.

विठ्ठलमूर्तीवर संरक्षण लेप देण्याच्या प्रक्रियेला सुरवात झालीय. अभिषेकामुळे मूर्तीमध्ये चिटकलेले दही,दूध आणि मधाचे कण काढण्याचं काम काल करण्यात आलं. मुद्दा समोर आला तो यापुढे होणारी झीज रोखण्याचा. कारण दही दुधाच्या महापूजा, पदस्पर्शदर्शन, आणि डोकं टेकवून दर्शन घेण्याच्या प्रथांमुळे मूर्तीची झीज होते हे यावरुन स्पष्ट झालं. त्यामुळे उत्सवमूर्तीच्या पायांवर चांदीच्या पादुका आणि ऍक्रॅलिकचं आवरण ठेवण्याचा पर्यायही समोर आला आहे. पण यावरुन मतभेद आहेत.

याआधी मूतीर्ंची झीज रोखण्यासाठी तत्कालीन मंदिर समितीचे सदस्य शशिकांत पागेंनी महापूजेसाठी उत्सवमूतीर्ंच्या पर्यायाला मंदिर समितीची मान्यताही घेतली होती. मात्र त्यानंतर पागेंनी अचानक राजीनामा दिल्याने हा विषय मागे पडला. पण आता लेपनप्रक्रियेचा मुद्‌दा चर्चेत असताना या पर्यायावरही निर्णय होणं गरजेचं आहे.

आयबीएन-लोकमतचे सवाल 1) महापुजेमुळे मूर्तीची झीज होते हे स्पष्ट झाल्यावरही महापुजेचा आग्रह का?2) उत्सवमुर्तीवर अभिषेक आणि महापुजेच्या पर्यायाकडे दुर्लक्ष का?3) किती वेळा करणार लेपनप्रक्रीया, यावरही काही बंधन आहेत का?4) वारकर्‍यांच्या प्रबोधनासाठी पुढाकार का नाही ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2012 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close