S M L

श्रीलंकेत नरसंहाराविरोधात भारत अमेरिकेच्या बाजूने - पीएम

19 मार्चश्रीलंकेत लिट्टेविरुद्धच्या युद्धकाळात झालेल्या नरसंहाराविरोधात अमेरिका संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत ठराव मांडणार आहे. यावेळी भारत अमेरिकेच्या बाजूने म्हणजेच श्रीलंकेच्याविरोधात मतदान करणार आहे असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. श्रीलंकेत तामिळी लोकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात दक्षिणेतल्या द्रमुक, अण्णाद्रमुकसह सर्वच राजकीय पक्षांनी केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. द्रमुककडून होणार्‍या वाढत्या दबावामुळेच अखेर श्रीलंकेविरोधात मतदान करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. यापूर्वी भारताने कधीही श्रीलंकेच्या विरोधात मतदान केलेलं नाही. अशी वेळ जेव्हाजेव्हा आली तेव्हा भारताने तटस्थ राहणंच पसंत केलंय. पण यावेळी घटक पक्षाच्या दबावामुळे परराष्ट्र धोरणातच बदल करण्याची वेळ सरकारवर आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2012 05:35 PM IST

श्रीलंकेत नरसंहाराविरोधात भारत अमेरिकेच्या बाजूने - पीएम

19 मार्च

श्रीलंकेत लिट्टेविरुद्धच्या युद्धकाळात झालेल्या नरसंहाराविरोधात अमेरिका संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत ठराव मांडणार आहे. यावेळी भारत अमेरिकेच्या बाजूने म्हणजेच श्रीलंकेच्याविरोधात मतदान करणार आहे असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. श्रीलंकेत तामिळी लोकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात दक्षिणेतल्या द्रमुक, अण्णाद्रमुकसह सर्वच राजकीय पक्षांनी केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. द्रमुककडून होणार्‍या वाढत्या दबावामुळेच अखेर श्रीलंकेविरोधात मतदान करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. यापूर्वी भारताने कधीही श्रीलंकेच्या विरोधात मतदान केलेलं नाही. अशी वेळ जेव्हाजेव्हा आली तेव्हा भारताने तटस्थ राहणंच पसंत केलंय. पण यावेळी घटक पक्षाच्या दबावामुळे परराष्ट्र धोरणातच बदल करण्याची वेळ सरकारवर आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2012 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close