S M L

मनसे घेणार 'नाशिक'चा ठाण्यात बदला ?

19 मार्चठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन ठाण्यातल्या राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. ठाण्याच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला होता. पण आज स्थायी समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बैठकांच्या सत्रात मनसेचे नेते आघाडीच्या बैठकीला हजर राहिले. त्यामुळे मनसेनं नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीतला वचपा काढला की काय अशी चर्चा सुरु झाली. मनसेचे ठाण्यातील नेते सुधाकर चव्हाण हे आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीला हजर राहिले. स्थायी समितीचं अध्यक्षपद महायुतीकडे जाऊ द्यायचं नाही अशी रणनीती आखली जातेय. ठाणे महापालिकेत याबाबतची बैठक सुरु आहे. त्यामुळे ठाण्यातल्या राजकारणाला आता पुन्हा रंग चढू लागलाय. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांची निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर सभागृह तहकूब करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2012 11:04 AM IST

मनसे घेणार 'नाशिक'चा ठाण्यात बदला ?

19 मार्च

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन ठाण्यातल्या राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. ठाण्याच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला होता. पण आज स्थायी समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बैठकांच्या सत्रात मनसेचे नेते आघाडीच्या बैठकीला हजर राहिले.

त्यामुळे मनसेनं नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीतला वचपा काढला की काय अशी चर्चा सुरु झाली. मनसेचे ठाण्यातील नेते सुधाकर चव्हाण हे आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीला हजर राहिले. स्थायी समितीचं अध्यक्षपद महायुतीकडे जाऊ द्यायचं नाही अशी रणनीती आखली जातेय. ठाणे महापालिकेत याबाबतची बैठक सुरु आहे. त्यामुळे ठाण्यातल्या राजकारणाला आता पुन्हा रंग चढू लागलाय. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांची निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर सभागृह तहकूब करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2012 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close