S M L

राजू शेट्टींचे आंदोलन आठ दिवसांसाठी स्थगित

20 मार्चकांदा प्रश्नावरुन कालपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नाशिकमध्ये आंदोलन सुरु केलं होतं. ते आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावरुन आज विधानसभेत निवेदन केलं. त्यानंतर राजू शेट्टींनी पुढचे आठ दिवस हे आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर केलं. उद्या पणनमंत्र्यांच्या उपस्थित कांदा निर्यातदारांची बैठक घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. शिवाय कांद्यावरील किमान निर्यात मूल्य कमी करण्यासंदर्भात प्रयत्न करु असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2012 09:42 AM IST

राजू शेट्टींचे आंदोलन आठ दिवसांसाठी स्थगित

20 मार्च

कांदा प्रश्नावरुन कालपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नाशिकमध्ये आंदोलन सुरु केलं होतं. ते आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावरुन आज विधानसभेत निवेदन केलं. त्यानंतर राजू शेट्टींनी पुढचे आठ दिवस हे आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर केलं. उद्या पणनमंत्र्यांच्या उपस्थित कांदा निर्यातदारांची बैठक घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. शिवाय कांद्यावरील किमान निर्यात मूल्य कमी करण्यासंदर्भात प्रयत्न करु असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2012 09:42 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close