S M L

'गिरणी कामगारांना मोफत घरं नाहीच'

20 मार्चगेल्या 30 वर्षापासून हक्काच्या घरासाठी लढणार्‍या गिरणी कामगारांच्या हाती आजही आश्वसनच पडली. पण गिरणी कामगारांना मोफत घर देण्यास सरकारने नकार दिला आहे. आज गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्नावर कामगारांचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये चर्चा झाली. अर्ज भरलेल्या 1 लाख 48 हजार गिरणी कामगारांना घरं कशी उपलब्ध होतील आणि त्यासाठी जमिनीचे कुठकुठले पर्याय उपलब्ध आहेत याबाबतचा सुस्पष्ट प्रस्ताव दोन महिन्यांत सादर करणार आहे. तसेच घरांच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी कमी दराने कर्ज मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन सरकारने गिरणी कामगारांना दिलं. तर गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती कमी करण्यासाठी 7 दिवसात निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं त्याचबरोबर स्वांतत्र्यसैनिक गिरणी कामगारांना लॉटरी शिवाय घरं देणार असंही सरकारनं जाहीर केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2012 12:51 PM IST

'गिरणी कामगारांना मोफत घरं नाहीच'

20 मार्च

गेल्या 30 वर्षापासून हक्काच्या घरासाठी लढणार्‍या गिरणी कामगारांच्या हाती आजही आश्वसनच पडली. पण गिरणी कामगारांना मोफत घर देण्यास सरकारने नकार दिला आहे. आज गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्नावर कामगारांचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये चर्चा झाली. अर्ज भरलेल्या 1 लाख 48 हजार गिरणी कामगारांना घरं कशी उपलब्ध होतील आणि त्यासाठी जमिनीचे कुठकुठले पर्याय उपलब्ध आहेत याबाबतचा सुस्पष्ट प्रस्ताव दोन महिन्यांत सादर करणार आहे. तसेच घरांच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी कमी दराने कर्ज मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन सरकारने गिरणी कामगारांना दिलं. तर गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती कमी करण्यासाठी 7 दिवसात निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं त्याचबरोबर स्वांतत्र्यसैनिक गिरणी कामगारांना लॉटरी शिवाय घरं देणार असंही सरकारनं जाहीर केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2012 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close