S M L

नयना पुजारीला न्याय कधी मिळणार ?

20 मार्चपुण्यातील बहुचर्चित ज्योतीकुमारी चौधरी बलात्कार,खून प्रकरणाचा निकाल लागलेला असला तरी अशा अनेक खटल्यांमधील निकाल येणं बाकी आहे. नयना पुजारी प्रकरणही त्यातलंच एक...पुण्यातल्या आयटी कंपनीत काम करणार्‍या नयनाचाही ज्योतीप्रमाणेच 2009 मध्ये बलात्कार करून खून करण्यात आला होता. पुण्यातल्या सिनिक्रॉन कंपनीत काम करणारी नयना पुजारी 7 ऑक्टोबरला कंपनीतून बाहेर पडल्यापासून बेपत्ता होती. त्यानंतर खेड मधल्या जेरेवाडी इथं नयनाचा मृतदेह सापडला होता. ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. खून करण्यापूर्वी चौघांनी तिचं एटीएम कार्ड चोरून त्यातून पैसेही काढले होते. मात्र या प्रकरणातला आरोपी ससूनमधून पोलिसांच्या ताब्यात असताना सप्टेंबर 2011 मध्ये पळून गेला होता. त्यानंतर अजूनपर्यंत तो पोलिसांना सापडलेला नाही. एकीकडे आज ज्योतीकुमारीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दुसरीकडे नयनाचे दोषी मात्र फरार आहेत. आता तरी नयना पुजारीच्या प्रकरणात पोलीस लक्ष घालतील अशी आशा पुणेकर व्यक्त करतायेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2012 04:29 PM IST

नयना पुजारीला न्याय कधी मिळणार ?

20 मार्च

पुण्यातील बहुचर्चित ज्योतीकुमारी चौधरी बलात्कार,खून प्रकरणाचा निकाल लागलेला असला तरी अशा अनेक खटल्यांमधील निकाल येणं बाकी आहे. नयना पुजारी प्रकरणही त्यातलंच एक...पुण्यातल्या आयटी कंपनीत काम करणार्‍या नयनाचाही ज्योतीप्रमाणेच 2009 मध्ये बलात्कार करून खून करण्यात आला होता. पुण्यातल्या सिनिक्रॉन कंपनीत काम करणारी नयना पुजारी 7 ऑक्टोबरला कंपनीतून बाहेर पडल्यापासून बेपत्ता होती. त्यानंतर खेड मधल्या जेरेवाडी इथं नयनाचा मृतदेह सापडला होता.

ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. खून करण्यापूर्वी चौघांनी तिचं एटीएम कार्ड चोरून त्यातून पैसेही काढले होते. मात्र या प्रकरणातला आरोपी ससूनमधून पोलिसांच्या ताब्यात असताना सप्टेंबर 2011 मध्ये पळून गेला होता. त्यानंतर अजूनपर्यंत तो पोलिसांना सापडलेला नाही. एकीकडे आज ज्योतीकुमारीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दुसरीकडे नयनाचे दोषी मात्र फरार आहेत. आता तरी नयना पुजारीच्या प्रकरणात पोलीस लक्ष घालतील अशी आशा पुणेकर व्यक्त करतायेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2012 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close